| Home / Thursday Discourse / Excerpts |


-
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (१९.०७.२०१२)
॥ हरि ॐ ॥
ॐ मंत्राय नम: मध्ये श्रीगुरुक्षेत्र-बीज मंत्र आपण बघितला. पुढे सुरू होतोय तो अंकुरमंत्र.
प्रत्येकाने स्वंयपाक करो अथवा नको पण कधी कडधान्य भिजत घातलेले बघितलेले असते. त्याला काही ठराविक काळाने मोड येतात. एकदा एक प्रयोग करा. एकच पावटा घ्यायचा तो भिजत घालायचा त्याला मोड येताना बघा. कधी येतो मोड दुसर्या दिवशी. पण ह्याची सुरुवात कधी होते? कोणाला माहीत आहे का? साधारण कडधान्ये १२ तास भिजत ठेवावी लागतात. बरोबर त्यातले सहा तास तुम्हांला माफ. तुम्ही मोड कसे येतात ते सुरुवातीचे सहा तास नाही बघितले तरी चालेल. पण नंतरचे सहा तास बघत रहा. तुम्ही म्हणाल बापू काहीतरीच काय? झोप लागेल आम्हाला. फारच कठीण आहे. सहा तास बघत राहणे. ठीक आहे मग एक कळी घ्या. ती उमलताना कशी उमलते हे बघत रहा.
हे पण कठीण असेल तर अर्धी उमललेली कळी घ्या. किती वेळ लागेल तिला उमलायला? जास्तीत जास्त दोन तास बरोबर. कळी हातात धरायची आणि तिच्याकडे बघत रहा.
आपण कडधान्यांना मोड आलेले बघतो, कळीचे फुलात रूपांतर झालेले बघतो. पण ह्या बीजातून अंकुर येतो कसा? कळी उमलते कशी? हे अनुभवावे लागते. आपल्या स्वत:कडेच बघा. आपल्या मनात एखादा चांगला किंवा वाईट विचार येतो. त्या विचाराला अंकुर येतो कुठून? तो वाढतो कसा? ते कळत नाही. माझे वजन समजा ४०० किलो आहे व डॉक्टरांनी ते ६० किलो करायला सांगितले मग आजपासून मी dieting करणार हा विचार माझ्या मनात आला हे बीज आहे. मग ह्याचा अंकुर म्हणजे काय?
तुम्ही म्हणाल पाण्यात कडधान्य घातलं तर अंकुर दिसू शकतो, पण बीज जमिनीत असेल तर त्याचा अंकुर कसा दिसणार? गेल्यावेळेला आपण बघितले मन म्हणजे क्षेत्र आहे. म्हणजेच शेतजमीन आहे. मग अशा ह्या मनातले बीज आम्हाला कसे दिसणार ?
मला सांगा तुम्ही जी भाषा बोलता ही तुम्ही बनवलेली असते का? तुम्ही स्त्रिया नेहमी गॅसच्या शेगडीवर जेवण बनवता, पण ही गॅसची शेगडी कशाने बनते ह्याची theory इथे बसलेल्या कुणी स्त्रिया शिकल्या आहेत का? नाही.
आजच्या काळात सगळ्या लोकांच्या हातात मोबाईल असतात. मी लहान असताना त्या काळात घरात एकच फोन असायचा तोसुद्धा ५-६ महिने बंद असायचा. आज तुम्ही जे एवढे सगळे फोन वापरता त्याची सगळी theory तुम्ही शिकला आहात का? नाही.
म्हणजेच, आपण जी गोष्ट वापरतो त्यामध्ये आपण काय शिकतो तर माझ्यासाठी काय आवश्यक आहे ते.
प्रत्येक मनुष्याने जर ठरवलं की प्रत्येक गोष्ट मी अनुभवणार आणि मगच करणार तर ते शक्य आहे का? असे घडू शकत नाही.
एखादी स्त्री जेव्हा म्हणते मी चिकन केले तेव्हा ते आधी कोणी तरी केलेले असते, म्हणूनच ती करू शकते ना.
एक लक्षात ठेवा, जगात कुठलीही गोष्ट नवीन नाही. There is no inventions only discoveries. आपण जे काही करतो, जे काही आपल्याला मिळते ते आपण निर्माण केलेले नसते. म्हणून जेव्हा आम्ही मी केले असे म्हणतो तेव्हा ते मी केलेले नसते. ते आधी कुणीतरी केले त्याच्या अनुभवामुळे किंवा मी कुठेतरी शिकल्यामुळे मी करु शकतो.
समजा तुम्हांला सायकल चालवता येते आणि जर तुम्हांला बैलगाडी चालवायला दिली तर? तुम्हांला जमेल का? नाही. प्रत्येक गोष्टींचे technique वेगळे असते.
प्रत्येक गोष्ट शिकायची ठरवलं तर हे शिकू की ते शिकू अशी द्विधा मन:स्थिती होईल.
पूर्वी आमच्यावेळी एका inter science नंतर ठराविक शिक्षणाच्या branch असायच्या. आता शिक्षणसंस्थांचे एवढे option असतात की नक्की काय करावे, कुठे admission घ्यावी हे कळत नाही. जेवढे choice जास्त तेवढं confusion जास्त.
आधी फक्त MBBS एके MBBS असायचे. मधल्या काळात फक्त engineer साठी admission घेतल्या जायच्या आता CA एके CA करायचा अट्टहास असतो. अशावेळी पालकांनी विचार करायला हवा की, माझ्या मुलांना हे शिक्षण झेपणार आहे का?
कशाला मुलांवर ठराविक शिक्षणाचाच तुमचा हट्ट लादता? बाकीचे जे इतर शिक्षण घेतात ते काय फालतू आहेत? ते काय नीट जगू शकत नाहीत का?
पण आम्ही आमच्या गोष्टी सतत मुलांवर लादत असतो. हल्ली तर मुलांपेक्षा त्यांच्या आई-वडिलांचाच अभ्यास जास्त असतो. पण असे करून तुम्ही मुलांना परावलंबी बनवता हे लक्षात घ्या.
बरेच पालक सांगताना दिसतात की आमची मुलगी अभ्यासात हुशार आहे, भरतनाट्यम् पण शिकते, computer चा स्पेशल class करते, रांगोळीच्या क्लासला जाते, भरतकाम शिकते, कुकींग शिकते. आता मला सांगा त्या मुलीने नक्कीच काहीतरी पाप केले असेल म्हणून एवढ्या गोष्टी पालक करायला लावतात.
मुलांच्या बाबतीत पण तेच. बापाच्या ज्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नसतात, त्या सर्व त्यांना वाटते मुलाने पूर्ण कराव्यात. पण आपल्या इच्छा मुलावर लादताना मुलाचा स्वभाव, त्याची प्रकृती, त्याला झेपेल की नाही ह्याचा जराही विचार पालक करत नाहीत. मुलगा नेहमी करिअरच्या भीतीखाली एवढा गाडला जातो की मार्क कमी पडले म्हणजे काहीतरी मोठे पाप झाले.
मुलावर अभ्यासाचा भार टाकताना त्याच्या तब्येतीकडे आपण दुर्लक्ष करतो. मुलाचे स्नायू बळकट असतात, त्यांना व्यायामाची आवश्यकता असते.
मुलगा असो वा मुलगी त्यांना व्यायाम आलाच पाहिजे. पण आम्ही ते मुलांनी करावे, ह्यासाठी कधी मागे लागत नाही. आम्ही फक्त बौद्धिक विकास करायला बघतो पण विकास कशातून होतो, तर अनुभवातून.
जर असे नसते तर medical च्या शिक्षणानंतर internship हे practical training देणारे अनुभव देणारे वर्ष अभ्यासक्रमात नसते.
बुद्धी ही अनुभवातून तयार होत असते. अनुभव नसेल तर बुद्धी संकुचित होते. जो मनुष्य विद्यार्थी म्ह्णून संपला तो संपला. म्हणूनच मानवाच्या आयुष्यात शोधक वृत्ती व संग्राहक वृत्ती हवी. जे चांगलं आहे ते शोधत राहायचे व जे चांगले आहे ते साठवायचे, त्याची जोपासना करायची, मग ते थोडं जरी असेल तरी चालेल, हळूहळू तेच चांगलं वाढवत न्यायचे. ही शोधक वृत्ती व संग्राहक वृत्ती कशी आत्मसात करायची हे प्रत्येकाने आपापल्या जीवनानुसार ठरवायचे.
आपलं जीवन सतत बदलत असते. आमच्यावर येणारी संकटे बदलत असतात. ह्या सतत बदलत राहणार्या जीवनात आम्ही बदललो नाही, तर आम्ही टिकणार नाही.
आपली मुलं जरी त्यांच्या मित्रांबरोबर पिकनिकला गेली, तरी रात्री मुलं घरी आल्यावर ते कुठल्या व्यसनाच्या आहारी नाहीत ना गेले हे वास घेऊन बघितलेच पाहिजे. ह्यासाठी आपला मुलगा किती वाजता घरी आला हे पाहण्यासाठी आई-वडील रात्री जागे राहिले पाहिजेत. ज्या घरात आई-बाबा मुलं येईपर्यंत जागे राहतात त्या घरी मुलं आपोआप वेळच्यावेळी परत येतात.
ह्यासाठी मुलांचे संगोपन करण्याची वृत्ती पालकांमध्ये असायला ह्वी. हे कधी होईल जेव्हा आम्ही स्वत:ला विद्यार्थी दशेत ठेवू तेव्हाच. कारण जग हे सतत बदलत असते. एखाद्या वृद्ध आजारी अगदी मरणाच्या दारात असलेल्या व्यक्तीच्या शरीरात पण नवीन पेशी बनतच असतात.
अशा ह्या सतत बदलणार्या जगात मानवासाठी भक्कम आधार कुठला? तर एकच. ह्या जगात कधीही न बदलणारी गोष्ट म्हणजे माझी (परमपूज्य बापू) आई आणि म्हणूनच तिचे कुल तिचा परिवार पण कधीही बदलत नाही आणि बदलणार पण नाही. ह्यासाठीच हा आधार आम्ही घट्ट धरून ठेवायला पाहिजे.
समजा तुम्हांला एखाद्या वाळवंटात नेऊन सोडलं. तुम्ही नक्की कुठे आहात हे तुम्हाला माहीत नाही. अशावेळी तुमच्याकडे एखादे होकायंत्र असेल किंवा आत्ताच्या मोबाईलमध्ये GPS असते, त्यावरून तुम्हांला दिशा कळू शकेल. पण ह्या गोष्टी मानवनिर्मित आहेत. त्या बंद पडू शकतात. पण तरीदेखील सूर्य त्याची दिशा कधीच बदलत नाही. जरी दुसरे काहीच साधन नसेल तर सूर्य दिशा सांगण्याचे काम करणारच कारण सूर्य-चंद्र हे मानवनिर्मित नाहीत. जीवन एवढं सोप आहे. किती जणांनी कुंभार बघितला आहे? खरा नाही तरी पिक्चरमध्ये बघितलाच असणार. "विठ्ठला तू वेडा कुंभार" खरोखरच तो विठ्ठल वेडा कुंभार आहे.
तुम्ही बघितलं असेल कुंभार त्याच्या चाकावर मडक्याला आकार देत असतो. पण तो आकार देताना मध्येच तुम्ही बोट लावत राहिलात काही वस्तू लावत राहिलात तर त्याप्रमाणे त्या मडक्याचा आकार बदलतो.
आमच्या जीवनातसुद्धा आमचा आकार असा बदलत जातो, तसे आम्ही बदलतो हा आकार कोण बदलत असतो तर आमच्या आजूबाजूची परिस्थिती, आमच्या भवतालची माणसे. मग जसा shape (आकार) मला माझ्या जीवनाला द्यायचा होता तसा मी देऊ शकलो का? ह्याचे उत्तर जर तुमचे negative असेल तरी दु:खी होण्याचे काहीच कारण नाही.
एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, माझं वय १६ असो की ९६ असो माझ्याकडे जर माझा बापू आहे आणि गुरुक्षेत्र मंत्र आहे तर हा वेडा कुंभार तुमच्या जीवनाला shape (आकार) देणारच. हा काही त्यासाठी पैसे घेत नाही. पण ह्यासाठी त्याला आमंत्रण मात्र द्यावे लागते.
मग हे कसे घडणार? माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती माझे जीवन घडवत असते. लहानपणी आई-वडील नवीन घडवतात, मग शिक्षक घडवतात, नंतर नवरा-बायको एकमेकांचे जीवन घडवत असतात. सगळे मिळून मला बनवतात. मग मी काय केलं?
संतांची गोष्ट वेगळी. ते त्यांचे जीवन घडवू शकतात. पण आपण सामान्य माणसं आहोत. इथे कुणी संत असेल तर मला सांगा. मी त्याचे पाय पकडतो. पण मी (परमपूज्य बापू) एकदा का पाय पकडले तर सोडत नाही हे लक्षात ठेवा.
मी माझ्या आईचे पाय सोडवायचे म्हटले तरी सोडू शकत नाही. माझ्या गुरुने तर माझे हातच त्यांच्या पायावर ठेवून घेतले आहेत. सद्गुरुतत्त्व नेहमी मानवात जे वाईट बीज आहे त्याला मोड कसा येणार नाही त्याची काळजी घेत असते.
ह्या अंकुर मंत्रामुळे आमच्या आजूबाजूच्या वातावरणात, आमच्या मनोमय, प्राणमय देहातील जी काही चुकीची बीजे आहेत ती कधीच वाढू शकत नाहीत. मी अनेकवेळा सांगितले आहे की तुम्ही स्वत:ला दोष देण्याचे थांबवा. एकदाच तुम्ही ह्या आई चण्डिकेसमोर मनापासून क्षमा मागा. परत परत मी केवढा पापी, मी किती वाईट हे उगाळत बसू नका.
सद्गुरुचे पाय पकडून एकदा मनापासून क्षमा मागा त्याच्यासमोर आपली काही चूक नाही, असले मुखवटे घालू नका. आणि एकदा का त्याच्याकडे क्षमा मागितली की मग त्यातच अडकून स्वत:ला त्रास करून घेऊ नका. तुम्ही काय अनाथ आहात का? मी सांगितलंय का कधी की जा मरा, तुमचं तुम्ही भोगा.
मी कधी टाकलयं का तुम्हाला? मला पण कंटाळा येतो तुमचे तेच तेच स्वत:चे दोष, पापे ऐकून. कधीतरी मलासुद्धा चांगलं ऐकू द्या ना. माझेसुद्धा चांगले श्रवण घडू देत. तुमच्यात काय चांगले आहे, ते मला सांगा, मला ते ऐकायला आवडेल.
आता तुम्ही म्हणाल, मी तर सामान्य माणूस आहे, असे गेल्या वेळेला सांगितले. मग आम्ही बोललेलो तुम्हाला कसे कळणार बापू? तर हे सगळं मला कळतं ते माझ्या आईमुळे. मी फक्त लाऊडस्पिकर आहे. म्हणून जे काही चुकीचे तुमच्याकडून घडले असेल ते मनापासून फक्त एकदा सांगा.
गुरुपौर्णिमेला मी तुमच्याकडे काय मागितले? भेटवस्तू मागितल्या का? नाही. मी तुमचे अर्धे पाप मला द्या म्हणून सांगितले. खरंच सांगतो, मनापासून हे अर्धे पाप द्या आणि मोकळे व्हा तुमच्या ओझ्यापासून तुम्ही माझ्या ट्रेनमध्ये आता बसला आहात, आणि आता मग डोक्यावर ओझे का ठेवता?
पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते आत्तापर्यंतच्या सगळ्या मानवांचे पाप जरी तुम्ही एकत्र केले ना तरी माझा केसही वाकडा होणार नाही हे लक्षात ठेवा.
जर कोणाला पूर्ण गुरुक्षेत्र मंत्र म्हणता येत नसेल, कोणाला वेळ नसेल तर अशावेळी फक्त अंकुरमंत्र म्हटला तरी चालेल फक्तअंकुर मंत्र १०८ वेळा म्हटला तरी चालेल.
आपल्या प्रत्येकात पाप पुण्याची बीजे असतात. मग आम्ही पापाची बीजे का लावायची. मी तुमच्या पापाची भिक्षा मागायला आलोय ना तुमच्याकडे वाडगा घेऊन. पण तुम्हीच जर दार बंद ठेवलं तर मी काही करू शकत नाही.
तुम्ही मला पाप दिलंत तर त्या बदल्यात मी तुम्हाला पाप देत नाही पुण्यच देतो. कारण माझी आई ही क्षमेची मूर्ती आहे. जी रणदुर्गा आहे तीच मूर्तीमंत क्षमा आहे. म्हणूनच तुम्ही जी काही मला पापांची दक्षिणा देताय त्याबदल्यात मी तुम्हांला पुण्य देतोय.
जीवन अगदी सोप आहे, ते उगाचच कठीण करू नका. हा जो गुरुक्षेत्र मंत्र आहे तो मी आणि माझे नित्य गुरु याज्ञवल्क ह्यांनी माझ्या आईच्या साक्षीने प्रथम उच्चारला आहे. म्हणूनच मी खात्रीने सांगू शकतो की हाच एक मंत्र प्रत्येक युगात तारू शकतो. हाच खरा अभ्युदय मंत्र आहे.
आमचं जीवन उमलताना आम्ही कधी बघितलं नाही, कधी जीवन कुस्करले गेले कळले नाही. असं आमच्या बाबतीत कधी होणार नाही. आमचं जीवन फुकट जाणार नाही.
॥ हरि ॐ॥
आज गुरुमंत्र म्हणताना पहिले पद न घेता सुरुवात केली होती. ह्या श्रावण महिन्यात जो कोणी पूर्ण श्रद्धेने, सद्गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून हा मंत्र म्हणेल तेव्हा ते पहिले पद (ॐ श्री दत्तगुरुवे नम:) मी आपोआप त्यांच्यासोबत म्हणणार आहे. तुम्ही म्हणताना हा पूर्ण मंत्र म्हणू शकता. पण जर चुकून पहिले पद म्हणायचे राहिले तर ते मी म्हटलेले असेन तुमच्यासाठी तुम्ही जे तुमच्या नातेवाईकांनांही सांगू शकता. ह्या पुढे आपण अंकुरमंत्राचे एक एक पद बघणार आहोत.
-
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)
॥ हरि ॐ ॥
श्रीगुरुक्षेत्रम् मन्त्र, अंकुर मन्त्र त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आपण आहोत. हे पद खूप दिवस चालू राहू शकत ह्यात आपल्याला खूप काही शिकायच आहे. पुढच्या आठवड्यापासून मला इथे एक बोर्ड पाहिजे म्हणजे आपली शाळा सुरू झाली. ‘वर’ शद्ब आपण पुराणात वाचतो, ह्याला अमुक वर मिळाला त्याला तमुक वर मिळाला. त्यानंतर पत्रिकेमध्ये ‘वर आणि वधू’ मध्ये वर हा शद्ब आपण पाहतो. वर ब्रह्मर्षी देतात ते जे बोलतात ते खरं होतं. वरदान म्हणजे आपण म्हणतो ‘ह्याच्याकडे जन्मजात संगीताचं वरदान आहे.’ जन्मजात आहे म्हणजेच फार मेहनत करावी लागली नाही. मनुष्याला स्वत:ला काही मेहनत करावी न लागता जे सुंदर भव्यदिव्य मिळत ते वरदान असत. ऋषी तपश्चर्या करतात मग त्यांना वर मिळतो. तर काही ठिकाणी साध्याशा गोष्टींनी देव प्रसन्न होतो आणि वर देऊन जातो, एकाला दहा वर्षे तर एकाला एक दिवस. देव त्याच्या मनाला येईल तसे वागत राहतो. हा देव मोठा लहरी आहे. माझ थोड उशीरा आणि कमी भलं करतो तर इतरांच लवकर आणि जास्त भल करतो, हा देव काही सरळमार्गी नाही. हा मनाला येईल तस वागतो. पण तस कधीच नव्हतं, नसेल, आणि नाहीए.
‘वर’ शद्बाचा मूळ अर्थ मनुष्याच्या मानवी जीवनातील मानवी प्रयासाच्या मर्यादा जिथे संपतात जर ती व्यक्ती श्रद्धावान असेल तर तिथे परमेश्वराच्या सामर्थ्याचं connection आपोआप जोडलं जात. जेव्हा मनुष्याच्या प्रयत्नांमध्ये गुणात्मक जास्त गुणात्मक फरक पडणार नाही असे दिसते, तेव्हा चण्डिकाकुल, परमेश्वर आपोआप connection जोडून त्याला extra ताकद, यश देतात. म्हणजे जर पूर्वी १०० ग्रॅम प्रयत्नांना १० ग्रॅम यश मिळत होत, तिथे १० ग्रॅम प्रयत्नांना १०० ग्रॅम यश मिळते. हे connection केव्हा जोडल जात जोपर्यंत तुम्ही मानवी प्रयास पूर्णपणे मनापासून करता तेव्हा तो भगवंत connection आपोआप जोडतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला वेगळे नियम लावतात. कर्माचा अटळ सिद्धान्त सर्वांना समान असला तरी चण्डिकाकुल व तिचा पुत्र परमात्मा प्रत्येकाला वेगळे नियम लावतात त्यामुळे अनेक problems सुटतात.
नेहमी पहिल्या आलेल्या व्यक्तीला पुढे न्यायचे ठरवले तर काय होईल? बाकीचे कधीतरी पुढच्या वर्गात जातील का? उदाहरण म्हणून मीनावैनी, चौबळ आजोबा ह्यांना जेवढे marks मिळालेत त्यांच्या पटीत mark मिळाले तर तुम्ही वर याल अस असेल तर कोणी पास तरी होईल का? म्हणून प्रत्येकाला तो वेगळे नियम लावतो. प्रत्येक मनुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या कालखंडानुसार वेगवेगळे नियम ती चण्डिका आणि तिचा पुत्र लावतात. फक्त दोनच गोष्टी fix असतात - १) कर्माचा अटळ सिद्धान्त आणि २) पावित्र्य हेच प्रमाण. ह्याला अनुसरुनच ते partiality करतात. ताकद असतानाचे नियम तुम्हाला ताकद नसताना लावले तर, लहानपणीचे नियम वयस्कर झाल्यावर लावले तर घोटाळे होतील. म्हणून स्वत:ची तुलना कधीही दुसर्याशी करू नका. परमेश्वराची कृपा दुसर्यावर किती झाली आणि माझ्यावर किती झाली ह्याची तुलना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ज्याला हिरा खरा का खोटा माहित नाही तो हिर्याची तुलना कशी करणार. आम्ही परमेश्वराची कृपा बघितली नाही. परमेश्वर बघण लांब राहिल तो अनंत आहे त्याला समजून घेण शक्यच नाही. आम्ही लहान आहोत म्हणून परमेश्वराला आम्ही कसे जाणून घेणार. तर परमात्म्याची कृपा आमच्या आयुष्यात कुठे कुठे आली ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आपल्याला कळायला लागल्यापासून आमच्या जीवनात किती सुंदर गोष्टी घडल्या हे आठवलं की आपोआप आम्हांला परमेश्वराची कृपा नीट समजू शकते. ह्याला योगायोग मानू नका. ह्या जगात योगायोग नसतो. कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते. संकट येऊन गेल्यावर बापरे ! सुटलो - आठवा. परमात्म्याची कृपा कशी होते हे बघण्यासाठी दुसर्यांच जीवन बघण्याची, मूर्तीकडे बघण्याची, मोठमोठे धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या. माझ्या जीवनात मी चुकीचे वागत असताना पण परमेश्वराने किती मला भरभरून दिले हे आठवा.
पण मनुष्याचा मोठा problem हा आहे की त्याच्या स्मृती केन्द्रात जे मिळालं नाही, दु:ख प्रसंगाची नोंद जोरदार असतात. परमात्म्याने स्मृती दोन्ही गोष्टींची समानच दिलेली आहे. सुख म्हणजे काय तर आम्हाला मिळालेल सुख भागिले आमची सुखाची अपेक्षा. आमची सुखाची अपेक्षा अनंत असते. दु:ख म्हणजे काय तर आम्हाला असलेलं दु:ख भागिले दु:खाची अपेक्षा म्हणून दु:ख increase होत राहतं. मिळालेल्या सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. मिळालेल्या सुखाचा आनन्द आम्हाला परत-परत उपभोगता आला पाहिजे. मनुष्य नेहमी दु:ख परत परत जगत असतो.
मृत व्यक्तीच्या आठवणी परत परत येतात. पण ssc पास झालो कि त्याचा आनंद परत साजरा करत नाही. Degree मिळाल्याचा आनंद नोकरी मिळविण्यात हरवून जातो. लग्नाचा प्रसंग आठवत नाही, पण नवर्याला बायको काय बोलली आणि बायकोला नवरा काय बोलला हे चांगल आठवतं. आईचे धपाटे आठवतात पण तिचं रात्रभर जागण आठवत नाही. जो पर्यंत ती गोष्ट असते तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत नाही. ह्या जगातील पहिली मूर्ती कशी घडली रेणूकामातेची घडली. आईवर निस्सिम प्रेम करणारा परशूराम पित्याच्या आणि मातेच्या देहाभोवती काष्ट रचलेली, अग्नी दिलाय ज्याक्षणी मातेचं मुख दिसल नाही तेव्हा त्याने दत्तात्रेयांकडे विनंती केली की एकदा मला माझ्या मातेला पाहायच आहे. आईला पाहून परमात्मा असणारा परशूराम धावत आईजवळ गेला. त्याने आईला स्पर्श करताच फक्त तिचं मुख राहिल त्यातूनच ही मूर्ती घडली. ह्या विश्वातील पहिली मूर्ती परमात्म्याच्या मातेच्या विरहामुळे घडली. आई-वडिल गेले की आम्ही रडतो.
शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मुलांना मारून मुकटून आपण पाठवतो. हल्ली मुलांचे बालपण निघून गेलयं. तारुण्यात तारुण्याची शक्ती नुसती उधळली जाते. शरीर थकलं की माझं तारुण्य फुकट घालवलं म्हणून दु:ख करतो. ह्या प्रवृत्तीमुळे माणसाच्या स्मरणशक्तीत वेदनेची तीव्रता जास्त असते. वेदना खोलवर जाते. जे दु:ख आहे ते आहे. पण ह्याची माझी अपेक्षा शून्य नाही झाली तरी माझा सद्गुरु माझ्या दु:खापेक्षा मोठा आहे. मिळालेलं सुख पुढच्या वटवृक्षा एवढ्या सुखाचे बीज आहे हे लक्षात ठेवा. आपल्या स्मरणशक्तीला आपल्याला training द्यावं लागत. दुसर्याने केलेला अपमान पटकन आठवतो पण मान आठवत नाही. इथे चण्डिकाकुलाकडून मिळणारा वर आवश्यक असतो.
तिने रामाला वर दिला. तिच्यासाठी प्रत्येकाला नियम वेगळा आहे. ती रामाचे नियम तुम्हाला लावत नाही. चण्डिका आणि तिचे पुत्र माणसांशी युद्ध करत नाहीत त्यांच युद्ध असुरांशी असत. हेच आपल्याला मातृवात्सल्यविन्दानम् आणि उपनिषद् शिकवत. हे चण्डिकाकुल असूरांशी परिक्षा घेत मनुष्यांची परिक्षा घेत नाही.
एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ।
हा विश्वास मातृवात्सल्यविन्दानम् आणि उपनिषदाने दिला आहे. मनुष्याच्या चुकांमुळे वृत्रासूर उत्पन्न होतो. जो मनुष्य वाईट वागतो तो वृत्रासुराच्या प्रभावाखाली गेलेला आहे.
जो नियम ती रामाला लावते ती तो नियम आम्हाला लावणार नाही. त्यामुळे ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं नाही. आम्हाला प्रपंच प्रेमाने करायचा आहे त्याबरोबर परमार्थातही प्रगती करायची आहे. माझ्या भावाचा, शत्रुचा नियम ती मला लावत नाही. म्हणून श्रद्धावानाच्या शत्रुचा पराजय होऊ शकतो. पण आमची अपेक्षा असते तिने जेव्हा आम्हाला पाहिजे तसे नियम तिने आम्हाला लावावेत. पण आम्हाला अक्कल किती? तिचे नियम कुठले ते माहित नाही. ती कृपा कशी करते? वातावरणात बदल कसे घडतात हे माहित नसतं. एखाद्या मोठ्या अपघातून मनुष्य वाचतो कसा? हे त्याचं काम आहे, हे तोच करू शकतो आणि त्यासाठी त्याठिकाणी धावत जायची गरज नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. खेळ समजण्यासाठी खेळ बघावा लागतो, त्याचे नियम समजून घ्यावे लागतात. पण त्याचा खेळ बघणार कुठे कुठे? मग समजून कसा घेणार? डॉक्टर सांगतात ह्या मनुष्याच्या जीवनाचे दोन तास उरलेत तो मनुष्य दहा वर्ष संसार करतोय. ही परमात्म्याची लीला आहे. म्हणून शांतपणे एकच गोष्ट करायची, तिने सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं -
"माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते."
तुमच्यासाठी ती चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा परशूराम पण हे वाक्य उच्चारतो. म्हणजे रामासाठी फक्त एक चण्डिका आईच हे वाक्य उच्चारते. श्रद्धावानासाठी ती चण्डिकाही हे वाक्य उच्चारते आणि परशूरामही सगळ्या श्रद्धावानांच्या कानात सांगतो. आम्ही अवतारांपेक्षा डबल भाग्यवान आहोत म्हणून लक्षात ठेवा सामान्य श्रद्धावान भक्ताकडे अवताराच्या दुप्पट ताकद असते. तुमच्यासाठी चण्डिका आई आणि परमात्मा दोघेही वचन देतात. त्याच्याजवळ एक वरदान आहे तुम्हाला दोन वरदान आहेत.
तुम के प्रेमु राम के दुना
जन्मत: चण्डिकाआईच एक वरदान आहे - "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते" ज्याक्षणी देवयान पंथावर प्रवास सुरु करतो तेव्हा परमात्मा आमच्यासाठी उच्चारतो. ही दोन वरदान तिनेच दिली आहेत. तिने कानात सांगितलीत, परशुराम आम्हाला ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल बापू आमच्यासाठी काय आकाशवाणी होणार का? आकाशावाणी कोणासाठी होते - कंसासाठी तुम्ही काय कंस आहात का? त्यापेक्षा प्रेमवाणीचा स्विकार करा. आम्ही हे वाक्य कोणाच्या तोंडून ऐकलय ते लक्षात ठेवा. आम्ही हे वाक्य ऐकलयं हेही आठवत नसेल तरी काही नाही. कारण वासरू रस्ता चुकलं तरी गाय चुकत नाही. शिष्याला एकदा आपल म्हटल त्याचा मार्ग नरकात जाणारा असेल तरी हा नरकात जायला तयार असतो. आम्हाला नरक नाही हे आम्हाला माहित पाहिजे. कारण -
जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
आमचा रस्ता नरकाकडे जरी जात असला तरी तिथे साई येऊन उभा राहिल. आणि जिथे साई उभा आहे तिथे नरक असूच शकत नाही. आम्हाला जी प्रारब्धाच्या नियतीची भिती दासी आहे ती नियती चण्डिकेची यत्किंचित दासी आहे.
जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आज तुम्हाला decleare करतो जे अग्रलेख नीट वाचतात त्यांना आठवते का ते बघा तो देवीसिंह पाठीवर स्कंदचिन्ह घेऊन फिरतो. तिथेच एक शद्ब येतो श्वास शद्ब होता. ‘श्रीश्वास’ हा शद्ब नीट लक्षात ठेवा. हा आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे सहजतेने, प्रेमाने आणि पूर्णपणे कसा? त्याच्याविषयी मला माहित नाही. जेव्हा मला माझी आई सांगेल की आता ‘श्रीश्वास’ सगळ्यांना द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी declare करेन, पण त्यासाठी तिने मान हलवली पाहिजे.
॥हरि ॐ॥
-
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)
॥ हरि ॐ॥
आज हनुमन्त पौर्णिमा आहे त्याचबरोबर आदिमातेच्या उत्सवाचा दिवसही आहे. भारतात सगळीकडे आज महिषासुरमर्दिनीच्या देवळांमध्ये जत्रा असतात. असा हा आजचा पवित्र दिवस आहे आणि त्यात आज गुरुवार आहे.
मनात अनेक विचार येत असतात. जो विचार नको असतो तो मनात येतो आणि हवा असणारा विचार येत नाही. ही परिस्थिती ह्या स्वस्तिक्षेम संवादामुळे नाहिशी होते. नको असलेला विचार येणे आणि पाहिजे तो विचार न येणे म्हणजे तुमचा फोकस नाही. तुमच्या बुद्धीचा मनावर control नसतो. आदिमातेची अठरा प्रभावकेंद्रे प्रत्येक मानवाशी जोडलेली असतात. प्रत्येक मनुष्य १४ वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र होतो तेव्हा कोणतं connection तोडायचं आणि कोणतं जोडायचं ह्याचं स्वातंत्र्य त्याला असतं. ही १८ connections आम्हाला ह्या संवादातून जोडून मिळतात. weak connections नां जास्त power देण्याचं काम गुरुक्षेत्रम् मध्ये होतं.
आजचा दिवस अंजनामाता आणि आंजनेय हनुमन्त ह्या दोघांचाही दिवस आहे. आजचा दिवस असा आहे जो चण्डिकेचाही आणि तिच्या पुत्रांचाही आहे. म्हणूनच ह्या पवित्र दिवशी श्रीस्वस्तिक्षेम संवाद साधताना जीवनात आतापर्यंत जे काही चांगलं मिळालं आहे ते आठवायचं आणि शेवटी ‘मी अंबज्ञ आहे’ असं म्हणायचं.
आज आपल्याला आद्यपिपादादांचे अभंग ऐकायचेत आहेत. पहिला अभंग अतिशय सुंदर आहे.
‘इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश । प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण’
आरशात प्रतिमा दिसते पण आरशाला कोणी विचारत नाही. इंद्रधनुष्याच्या नादात आकाशाला विसरतो. जे महत्त्वाचे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष कमी वेधलं जातं. मूळ गोष्टीत मनुष्य जास्त interest घेत नाही. शेवटी ज्या मूळ गोष्टीमुळे इतर गोष्टी मिळतात तिला विसरलं तर इतर गोष्टी कशा मिळणार?
समजा एक स्त्री सुंदर स्वयंपाक बनवते नवर्याला सगळं काही त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याचबरोबर घरातील इतर कामेही व्यवस्थित करते. पत्नीपासून मिळणार्या लाभात तो नवरा interested आहे पण तिच्यावर पत्नी म्हणून प्रेम करण्यात तो interested नाही. मग ती काय तुमच्या घरची मोलकरीण आहे? पत्नीपासून मिळणारे लाभ तिच्या पत्नीत्वामुळे मिळतात.
मूळ गोष्ट राखावी लागते, तर बाकीच्या गोष्टी मिळतात. आम्हाला एखादी वस्तू दिसते आहे. ती का दिसते? त्या वस्तूवर प्रकाश पडल्यामुळे दिसते आहे. पण नुसता प्रकाश असून चालेल का? जर तुमच्याकडे बघण्याची क्षमता नसती तर ती दिसली असती का? तर सगळ्या महत्त्वाची important गोष्ट आहे बघण्याची शक्ती जी देवाने तुम्हाला दिली आहे.
जीवनात जे दिसतं त्याच्या प्रतिमेत आम्ही अडकतो. आरसा स्वच्छ ठेवला नाही तर तो प्रतिमा दाखवेल का? स्वार्थ साधण्यासाठी तरी भगवंताला विसरलो नाही तरी भगवंताशी जोडून राहतो.
हे अभंग हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत. हे सगळ्यांच्या जीवनात जे काही घडलंय तेच सांगतात. साधी उदाहरणं दिली आहेत. जे साधं असतं तेच बेस्ट असतं. सगळ्यात बेस्ट गोष्टच सगळ्यात साधी असते हे मानवी मनाला पटत नाही आणि पटेपर्यंत जायची वेळ जवळ आलेली असते. साध्यासुध्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत आणि सगळ्यात बेस्ट आहेत.
॥ हरि ॐ ॥
-
परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)
॥ हरि ॐ॥
साडेतीन मुहूर्तामधील एक पवित्र दिवस, सर्वात श्रेष्ठ दिवस ह्या दिवसातला क्षण न क्षण पवित्र, सुंदर, शांती समाधान देणारा मानला जातो. अतिशय सुंदरपणे पवित्र भावाने आज स्वस्तिक्षेम संवाद साधायचा आहे. जे तिच्याशी बोलायचं आहे ते तिला अतिशय सौम्यपणे सांगा. ह्या सुंदर दिवसाचं पावित्र्य जपत संवाद साधुया.
आज आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या सुंदर पदाला -
ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’.
तशी सगळीच सुंदर आहेत आपण ह्या मोठ्या आईचं पद पाहायचं आहे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ‘रामवरदायिनी’ ह्या एका शद्बामध्ये काय आहे हे लक्षात येतं. ह्याचा मूळ अर्थ रामाला वर देणारी हा आहे. ह्यात सात अक्षरे आहेत. हे नाव खूपच वेगळे आहे. कारण हा तिचा अवतार पण वेगळा आहे. हा सहावा अवतार आहे.
तिचं मूळ नाव काय आहे - महिषासुरमर्दिनी. हे नाव कसं आहे जो महिषासुर आहे, त्याचा नाश करणारी म्हणजे तिचं मूळ नाव नाहीच. तिचं अस्तित्व म्हणजेच महिषासुराचं अनस्तित्व. अशीच ती रामासाठी युद्धभूमीवर प्रकटली कारण रावण मरत नव्हता म्हणून आणि काकासुर आलेला आहे. हा काकासुर कोण आहे, आपण मातृवात्सल्यविन्दानम् मध्ये बघतो, हा शुंभाचा पुत्र आहे. प्रेमप्रवासमध्ये आपण पाहिलंय रावण म्हणजे काय? इथे लक्षात घ्यायचं आहे हे असं स्वरूप आहे ज्या रूपात तिने एक मोठं समीकरण घातलेलं आहे आणि सोडवलेलंही आहे. राम वर आधी ‘रा’ आणि नंतर पुन्हा ‘र’ आणि मग ‘दायिनी’ ‘श्री’ बाजूला काढून आपण ‘रामवरदायिनी’ कसं फोड करून लिहिणार - र + आ + म + व + र + द + आ + य + इ + न + ई. ‘न’ चा ‘ण’ कसा होतो तर ‘र’ च्या सान्निध्यात ‘राम’ नाम तसंच आहे पण ‘रावण’ नावाचा तिने चोळागोळा केलाय, त्याला उलटंपालटं केलयं. म्हणजेच तिच्या ह्या नामात ज्याच्या हातून शत्रूचा नाश करायचा आहे आणि ज्याचा नाश करायचा आहे, ज्या शत्रूचा नाश करायचा त्यांची नाव आहेत. जो शत्रू आहे, त्याचं नावसुद्धा तुकडे तुकडे करून आपल्या गर्भात तिने ठेवलेलं आहे. ही रामवरदायिनी रामाला वर देणारी आहेच आणि ती प्रत्येक मनुष्यालासुद्धा बेसिक सांगते की ‘रामनाम’ हेच नाव रावणाचा नाश करण्याचं महत्वाचं शस्त्र आहे. सर्व श्रद्धावानांना दिलेला वर आहे. ह्या नामात रावणाला मारणारा ‘राम’ आहे, तुकडे तुकडे झालेला, खंडित झालेला ‘रावण’ पण आहे आणि ‘ईकार’ ही आहे ‘ईकार’ म्हणजे ‘शक्ती’. रामानामात तिची स्वशक्ती आहे, ती धारण करून तिने अवतार घेतलेला आहे आणि रामाकडून तिने रावणाला मारविले आहे. तुमच्या जीवनात रावण आला तर घाबरायचे कारण नाही.
ही रामवरदायिनी ह्या मन्त्रामध्ये तिच्या नामासकट रावणाचा वध होऊन बसलेली आहे. म्हणून आरतीत काय आहे? आरतीत आपण काय म्हणतो - ‘षष्ठीते श्रीरामवरदायिनी । अशुभनाशिनी रक्ष चण्डिके ।’ सध्या शुभंकरा नवरात्र सुरू आहे. ह्या नवरात्रीला ‘शुभ’ का म्हणतात. रामाचा जन्म झाला त्यावेळी ही नवरात्र संपते म्हणून. अश्विन नवरात्रीला रावणाचा मृत्यू झाला म्हणून ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. ही आदिमाता शुभंकरा असताना, अशुभनाशिनीही आहे. त्यासाठी तिने दोन टोकाची नामं धारण केली आहेत. तो जो कोणी शत्रू आहे, त्याचं नाव तिने मूळनाव म्हणून धारण केलं आहे. जो शत्रूचा नाश करणारा आहे त्याला वर देणारी आहे. तिने तिच्या मूळ धर्माला अनुसरून नाश केलेल्या शत्रूचं नाम धारण केलं आहे. हे नाव ह्या मन्त्रात आलं त्याचं हे background आहे. हेच इथे फिट आहे. ह्या मन्त्राचा (गुरुक्षेत्रम् मन्त्राचा) प्रत्येक शद्ब प्रचंड मोठी समीकरणं सोडवणार आहे तुमच्या नकळत.
आपलं शरीर असंख्य अणूंनी बनलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असंख्य पेशी आहेत, केमिकल्स आहेत, असंख्य अणू आहेत. अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन च्या पुंजक्यांनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं अख्ख शरीर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन ह्यांचे पुंजके आहेत. हे नातं महाप्राण maintain करतो, त्याला प्रेरणा अंजनामाता म्हणजे आदिमाता देत असते. प्रत्येक अणूला टिकवून हनुमन्त धरतो. त्याला चालना चण्डिका देते. एका अणूचं रूपांतर दुसर्या अणूत होतं ते ती करते. सगळी रचना तिचीच आहे. म्हणजे आम्ही पापं करतो ते आदिमाता करते का? वस्तूचे कण आहेत तसेच विचारांचे कणही आहेत. ह्या कणांना इच्छा शक्तीची मोकळीक तिने दिलेली असते, त्यात ती ढवळाढवळ करत नाही, आणि तिच्या मुलांनांही ती ढवळाढवळ करू देत नाही. माझ्या इच्छा, विचार, निवड चुकली तरी त्या विचारकणांवर माझीच सत्ता चालत असली, त्यांना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असलं तरी, त्याचात बदल करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. चुका करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यात आहे, आणि चुका दुरूस्त करण्याचं सामर्थ्य चण्डिकाकुलात आहे. तुमच्या चुका लक्षात आल्या तर जसे जमेल तसे नामस्मरण करायला सुरुवात करायची, चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागायचं त्यांना आवरण्याची सत्ता तिला आहे.
लहानपणी भोवरा फिरवलात त्याला नुसती दोरी बांधून चालेलं का? नाही. त्यासाठी skill यावं लागतं. सुरुवातीला ते येत नाही पण नंतर प्रॅक्टिसने ते येतं. मग तो भोवरा कसा फिरवायचा ते स्वातंत्र्य आहे. पण त्याच वजनाचा ठोकळा दिला तर तो फिरेल काय? नाही कारण तो भोवरा नाही. जेवढी तुमची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती महत्त्वाची आहे, तेवढचं वस्तुमानही महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, भोवरा चुकीच्या ठिकाणी आपटत असू तरीही त्या आदिमातेने आमच्या हातात भोवरा तर दिला आहे. विचार करणार्या मेंदूच्या पेशी तिने दिलेल्या आहेत. त्यांना चालना देण्यासाठी ती अंजनामातारूपाने सुप्तावस्थेत असते, आणि तिचा पुत्र महाप्राण शरीरात असतो. देवीसिंह युद्ध कसं करतो हे आपल्याला माहीती आहे, माझ्या विचारांना तुझ्या चरणांवर सोपवलं आहे, हे त्या देवीसिंहाला सांगावं लागतं. ज्या क्षणाला तुम्ही त्याला हे सांगता, तेव्हा तो मेंदूतल्या योग्य पेशींना प्रेरित करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी ती उचित नसेल तर तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुमचे चुकीचे विचार लगेच थांबतात. तुमच्या रस्त्यात तो आडवा येतो, त्यामुळे तुम्हाला हवीशी वाटणारी गोष्ट तो प्रेमाने दूर करतो आणि तुम्ही म्हणता देव माझ्याशी किती कठोर वागतो.
अनिरुद्धावरचा विश्वास, गुरुक्षेत्रम् मन्त्रावरचा विश्वास, आणि त्याच्या आईवर तुमचं प्रेम असेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. ती स्वत: गुरुक्षेत्रम् मन्त्रात आमच्यासाठी एकाच वेळी शुभंकरा आणि अशुभनाशिनी बनून आलेली आहे, ती श्रद्धावानांसाठी आधी शुभंकरा नंतर अशुभनाशिनी किंवा आधी अशुभनाशिनी आणि नंतर शुभंकरा नसते. ती एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडवून आणते.
हा देवीसिंह जो आईच्या समोर तोंड करून उभा आहे तो कसा आहे? सगळीकडे देवाचं वाहन देवाकडे तोंड करून बघत असतं. पण हा एकच असा आहे जो त्या आदिमातेसमोर जो कोणी उभा आहे त्याच्याकडे तोंड करून नेहमी attenation position मध्ये तो असतो. हा तिच्याकडे जो कोणी बघताहेत त्यांच्याकडे बघतोय. तिच्यासमोर कोण येतो त्यांच्याकडे हा बघतो. महिषासुरासारखा आदिमातेचा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा झेप घ्यायला तयार आहे आणि प्रेमळ भक्त असेल तर त्यांच्यावरही हा झेप घ्यायला तयार आहे पण कशासाठी त्यांच्यामागून येणारा शत्रू, संकट ह्यांचा नाश करण्यासाठी. मनुष्य देवाकडे धावत केव्हा येतो, जेव्हा तो संकटात येतो. हे एकमेव दैवत असं आहे, श्रद्धावानांकडे तोंड करून attention मध्ये उभा आहे. ‘युगे अठ्ठावीस उभा’ कुठल्याही क्षणी झेप घेण्यासाठी तो तयार आहे. आदिमातेचा शत्रू असेल तर त्याचा नाश करण्यासाठी झेप घेतो, आणि श्रद्धावान भक्तावर त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी झेप घेतो. उपनिषद् मध्ये शेवटचा अध्याय परशुराम आणि त्रिविक्रमाचं नातं सांगतो.
ह्या गुरुक्षेत्रम् मन्त्राचा प्रत्येक शद्ब फार वेगळी वेगळी समीकरणं सोडवत राहतो. ह्या पदातली सगळी प्रमुख समीकरणं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मन्त्रातील सगळी समीकरणं तुमच्या जीवनातील सगळ्या problems ची समीकरणं सोडवतील. चुकीच्या गोष्टीचं निराकरण, पापाचा नाश, अयोग्य ते नाश करणं, कमी आहे ते भरून करण्याची ताकद तुमच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट देणारा आहे. गुरुक्षेत्रम् मन्त्र समीकरण नाही तर तुमच्या जीवनात जे problem आहेत, समीकरणं आहेत त्याचं प्रत्येक solution ह्या मन्त्रात आहेच.
पुढच्या वेळेस आपण ह्या सात अक्षरांबद्दल शिकणार आहोत. आजच्या शुभंकरा नवरात्रीपासून आपण सुरुवात केली आहे. आपल्याला आनंद करायचाय, हया गंगेत डुबक्या मारायच्या आहेत. तुम्ही ह्यात बुडणार नाहीत हे लक्षात ठेवा. ह्या मन्त्राने अवगाहन करायचं आहे. आता आपल्याला हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कसा समीकरण सोडवत जातो ते पहायचं आहे. हे बरेच दिवस चालणार आहे. काळोखात चालत असताना माणसाचा हात धरलाय ज्याला पाऊल वाट माहितेय, तरी भीती वाटतेच की पायाखालून साप किंवा आणखी काय गेलं तर, पण जर प्रकाश असेल आणि bodygaurd पण बरोबर असेल तर भीती कसली? ह्या गुरुक्षेत्रम् मन्त्रावर खूप प्रेम करा, प्रेमाने हा मन्त्र म्हणा. ह मंत्र तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. हा गुरुक्षेत्रम् मन्त्र कसा निर्माण झाला व कोणी प्रथम म्हटला, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या आयुष्यात नाही तर, प्रत्येक आयुष्यात अनुभवायचं आहे.
॥ हरि ॐ ॥
|
| |
|
|
|
| |
| |
|
|