1     2     3     4     5  

Excerpts

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२१.०६.२०१२)

    ॥ हरि ॐ ॥


    सर्वप्रथम श्रीसाईसच्चरित पंचशील परीक्षा "पंचम" परीक्षेचा निकाल. एक सूचना इथे सांगायची आहे. आपल्या सूचनापेटीतून एक गोष्ट लक्षात आली की, काहीजण एकदा पंचशील परीक्षा झाल्यावर परत परत पहिल्यापासून पंचशील परीक्षेला बसतात. पंचम परीक्षेला आपल्याला जर्नल्स्‌ लिहावे लागतात तर असे जे एकदा पंचम परीक्षा झाल्यावर परत पंचमीला बसतात त्यांना पुन्हा जर्नल्स्‌ लिहिण्याची आवश्यकता नाही. त्यांच्यासाठी हा नियम मी शिथिल केला आहे. पण पहिल्यांदा पंचमी परीक्षा देताना जरनल्स लिहिणं आवश्यक आहे.

    आपण गुरुक्षेत्रम्‌ मंत्राचा अभ्यास करीत आहोत. बीजमंत्राचा शेवटचा भाग, अंतिम चरण आपण बघत आहोत बरोबर, "सर्वसमर्थं सर्वार्थसमर्थं श्रीगुरुक्षेत्रम्‌"

    आपण गुरु म्हणजे काय? क्षेत्र म्हणजे काय? हे आतापर्यंत बघितले. आता सर्वसमर्थ सर्वार्थसमर्थ म्हणजे काय? हे बघायचे आहे. बघितल तर ह्याचा अर्थ अगदी सरळ सोपा आहे.

    आम्ही व्यवहारात बोलतो की, अमुक वजन उचलायला तो समर्थ आहे, पण हा खूप क्षुल्लक अर्थ झाला. ह्याचा मूळ संस्कृत अर्थ काय? एखादी व्यक्ती, वस्तू, शक्ती, घटना किंवा वास्तू ही समर्थ कधी होते? ह्या पृथ्वीशी निगडित एक विश्व आहे, जे आपल्याला माहीत आहे. पृथ्वीच्या पलिकडे पण अनेक गोष्टी आहेत. पण जे आपल्याला माहीत आहे आपण त्याच्याविषयी बोलणार आहोत. जे मलाच(परमपूज्य बापू) माहीत नाही त्याविषयी मी तुम्हांला काय सांगणार? बरोबर.

    आपल्याला भूक लागते, तहान लागते, हे माहीत आहे, बरोबर. आपल्याला थकवा येतो, नैराश्य येते हे माहीत आहे. आपल्याशिवाय ही दुसरी माणसं, पशू, पक्षी, सजीव निर्जीव वस्तू आपल्या आजूबाजूला आहेत हे माहीत आहे. Right एवढं जरी तुम्हाला कळत असेल ना राजानों, तरी तुम्ही अध्यात्म जाणून घ्यायला समर्थ आहात, हे लक्षात ठेवा.

    ह्या विश्वातील प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ हा पंचमहाभुतांनी बनलेला आहे. ही पंचमहाभुते सगळ्या दृश्य अदृश्य पदार्थांचे मूलस्थान आहेत.

    आपण नुसता अग्नी बघतो. पण त्यामध्ये सुद्धा अग्नी महाभुताचे प्राबल्य असले तरी बाकी चार महाभुते आहेतच. ज्याअर्थी वायू तत्त्व आहे. जिथे अग्नी आहे, तिथे अवकाश आहे म्हणजे आकाशतत्त्व आहे. तो अग्नी स्थूल डोळ्यांना दिसतो, घनरुप आहे म्हणजे पृथ्वी तत्त्वही आहे. त्या अग्नीसाठी तेलाची-तूपाची आवश्यकता असते, म्हणजे जलतत्त्वही त्यात आहेच.

    आपण जेव्हा नुसते जल बघतो. पण तेसुद्धा ह्या पंचमहाभुतांनींच बनलेले आहे, ह्याच प्रमाणे मानवी देहातील प्रत्येक कण, ऊर्जा हे ह्या पंचमहाभुतांनींच बनलेले आहे. ह्याचे प्रमाण कुणात कमी जास्त असेल. ह्या पंचमहाभुतांची जी प्रत्येक पदार्थातील टक्केवारी नेमून दिली आहे, ती तशीच राहिली तर कुठलाही पदार्थ क्षय होत नाही. प्रत्येक गोष्टीतील ह्या पंचमहाभुतांचे मूळ प्रमाण जोपर्यंत मर्यादेत असते, तोपर्यंत ती गोष्ट नष्ट होत नाही. गेल्या गुरुवारी विजेचे उदाहरण दिले होते. आकाशात जी वीज चमकते तीच आपण घरात लाईटच्या (बल्ब, ट्युबलाईट) रूपात बघतो. ही वीज कशामुळे उत्पन्न होते? पाण्यामुळे, म्हणजे ह्यात जलतत्त्व आहे, अवकाश आहे म्हणजे आकाशतत्त्व आहे, हिचा वरून खाली प्रवास आहे म्हणजे वायुतत्त्व आहे, ही कडाडते म्हणजे ह्यात अग्नीतत्त्वही आहे, डोळ्यांना दिसते म्हणजे स्थूल स्वरूप आहे म्हणजे ह्यात पृथ्वीतत्त्वही आहेच. विश्वातील प्रत्येक गोष्टीत जे हे पंचमहाभुतांचे प्रमाण असते, ते बिघडले की सर्व गोष्टी बिघडू लागतात. "समर्थ" म्हणजे काय? तर ह्या विश्वातील प्रत्येक गोष्टीत असणारे हे पंचमहाभुतांचे प्रमाण जराही न बिघडू देता, ते अधिकाअधिक तेज:पुंज करणे, शक्तिशाली करणे. ह्याचा अर्थ काय? तर समजा एक मुलगा शाळेत गेला त्याला पाच विषय आहेत. त्याने एका विषयाचा अभ्यासच नाही केला पण त्याच्या बाकीच्या चार विषयांचा अभ्यास खूप चांगला झाला आहे, तर तो परीक्षेत पास व्हायला समर्थ आहे का? नाही. तोच दुसरा मुलगा ज्याचा सर्व विषयांचा अभ्यास जेमतेम झाला आहे, ज्याला सर्व विषयांबद्दल आवश्यक ती माहिती आहे. तो मुलगा परिक्षेत पास होऊन पुढच्या इयत्तेत जायला समर्थ बनतो.

    दुसरं उदाहरण बघू. घरात स्त्रिया अनेक पदार्थ बनवतात. सगळ्यात सोपा पदार्थ कोणता? काही जण भात सांगताहेत, काही चहा सांगत आहेत?

    ह्या चहाच्या बाबतीत तुम्हांला एक ऋग्वेदमध्ये असतानाची गोष्ट सांगतो. नवरात्रीत मी सकाळी ब्राह्ममुहुर्तावर चण्डी होम करतो. एकदा नंदा दमली होती, त्यामुळे मीच तिला म्हणालो, "तू उठू नकोस मी चहा करून घेईन." सकाळी पाऊणे तीनला उठलो तेव्हा सासूबाईंनी विचारले, "चहा करून देऊ का?" मी म्हटले, "नको, मी करेन." कारण चहा तर सोपी गोष्ट आहे. मग चहासाठी एक कप पाणी ठेवले, साखर दोन चमचे घातली, पावडर किती घालायची समजेना मग चहा पावडर दोन चमचे घातली, दूधपण घातले. पाच-दहा मिनिटांनी बघितले तर चांगले बुडबुडे येत होते. आधी कधी चहा केला नव्हता त्यामुळे बुडबुडे चहा गरम करताना येतात की नाही ते माहीतही नव्हते. तो ओतून घेतला, कसाबसा त्यातला दोन घोट पिऊ शकलो. पिताना वाटले काहीतरी नक्कीच गडबड झाली. दुसर्‍या मिनिटाला सारा बाहेर. नंतर कळलं, ती चहाची पावडर नव्हती तर शिकेकाईची पावडर होती. केस साफ होण्याऐवजी पोट साफ झालं होतं.

    इथे आमच्या शाळेतल्या एका सरांचे वाक्य आठवते ते नेहमी म्हणायचे, "पहिली नाही होत पास, आणि लागलाय अकारावीच्या गणिताचा ध्यास."  अशी काहीशी आपली स्थिती नेहमी असते.

    आपण कशाबद्दल बोलत होतो? तर सर्वसमर्थ म्हणजे काय? बरोबर. चहा करणे हे बघताना अतिशय सोपी गोष्ट वाटते. त्यात आपण योग्य प्रमाणात चहापावडर टाकली, साखर टाकली आणि उकळवला बरोबर. पण जर तिथे विस्तवच नसेल तर चहा होईल का?

    तसेच मी जर पाच वेगवेगळ्या चुली ठेवल्या, एकावर दूध, एकावर पाणी, एकावर साखर, एकावर चहापावडर ठेवून मग एकत्र केलं, तर चहा होईल का? त्याचप्रमाणे मी चहा केला पण गाळला नाही तर चालेल का? चहा करणे हे किती सोपी गोष्ट वाटते पण हे करतानासुद्धा आपल्या मनात किती प्रश्न येत असतात. किती जणांसाठी चहा करायचा? कुठल्या कपबशीतून चहा द्यायचा? पाहुणे आले असतील तर त्यांन चहासोबत काय द्यायचे? समजा चहा बशीत सांडला तर तो पाहुण्यांना तसाच देणे योग्य आहे का? त्यात आलेली व्यक्ती चहाच पीत नसेल तर अजून problem.

    आणि चहा करणारी व्यक्तीच जर नवीन असेल, तिने आधी कधी चहाच केला नसेल तर मोठाच problem. आमची माई घरात कधी जास्त लोकांचा स्वयंपाक करायचा असेल तर सांगायची, पाच मुठी मसाला टाक, दोन मुठी मीठ टाक. असा नुसता मारा असायचा. पण पदार्थाची चव मात्र best  असायची.

    तर आपण चहाच्याबाबतीत बघत होतो. एक चहा करणे आपण किती फालतू गोष्ट मानतो. पण लक्षात ठेवा, कुठलीही गोष्ट फालतू नसते. घरात राहणार्‍या स्त्रियांना नेहमी वाटते, आम्ही काहीच करत नाही, त्यामुळे त्या स्वत:ला फालतू समजू लागतात. ही पूर्णत: चुकीची समजूत आहे. घरी राहून गोष्टी करणं सोपी गोष्ट नाही. माझ्या आईने कधी नोकरी नव्हती केली, पण व्यवहारात ती एकदम परफेक्ट होती. चहा करण्याचा अनुभव घेतलेला असतो म्हणून ती गोष्ट सोपी वाटते. ज्या गोष्टींचा आपण नेहमी अनुभव घेत राहतो, त्या आपल्या परिचयाच्या होत जातात. त्यामुळे मग त्या आपल्याला फालतू वाटू लागतात. पण त्या फालतू नसतात, हे लक्षात ठेवा.

    ऑफिसमधला क्लार्क नेहमी म्हणताना आपण बघतो की, "मॅनेजरला काय खुर्चीत बसून ऑर्डर करायच्या असतात." पण त्या मॅनेजरच्या खुर्चीत बसल्यावर त्याची किती कामं असतात, हे कळू शकते.

    आम्ही आमच्या मनात प्रत्येक गोष्टीसाठी "अमुक गोष्ट सोपी, अमुक गोष्ट कठीण" अशाप्रकारचे वेगवेगळे कम्पार्टमेंट बनवत असतो. प्रत्येक गोष्टीबाबत आपण स्वत:ला कुठे ना कुठे कमी समजत असतो. प्रत्येक मनुष्याला एक किंवा हजारो गोष्टींत वाटत असते की, मी ह्यात कमकुवत आहे, weak आहे, लाचार आहे, आणि हीच गोष्ट मनुष्याचा नाश करत असते.

    तुमचे पूर्व प्रारब्ध, तुमचे शत्रुसुद्धा जिथे तुमचे पाय खेचू शकणार नाहीत, तिथे तुमची स्वत:ला कमी लेखण्याची भावना तुम्हाला खाली खेचते.

    समजा कुणाला वाटत असेल की, मी अतिशय फालतू आहे, तर असे वाटणे ही गोष्टसुद्धा फालतू नाही, हे लक्षात घ्या. कारण अशा वाटण्यामागेसुद्धा  तुमच्या प्रारब्धाचा ५०% वाटा असेल, तर तुम्ही ज्या वातावरणात वाढता त्याचा ५०% वाटा असतो.

    ह्या जाणिवेला भरून काढण्यासाठी मनुष्य आधार शोधत असतो. पण आधारसुद्धा पंचभौतिक असायला हवा म्हणजे कसा तर? आधार देणारी व्यक्ती ही प्रेमळही असली पाहिजे, कनवाळूही असली पाहिजे, तसेच तुम्ही चुकीच्या गोष्टी करू नये म्हणून ती शिस्तप्रियही असली पाहिजे व तिला तुमच्यासाठी वेळही देता आला पाहिजे. ती तुमच्यासाठी available ही असली पाहिजे.

    समजा तुमच्यावर संकट आले व तुम्हांला सगळ्या बाबतीत मदत करू शकणारा तुमचा भाऊ आहे. पण तो जपानला राहत असेल तर तो तुमच्या space मध्ये तुमच्या संकटाच्यावेळी येऊ शकत नाही. तो तिथे available होऊ शकत नाही.

    आम्ही आमच्या कमकुवतपणासाठी, weakness साठी सहाय्य शोधत राहतो. मग हे सहाय्य कधी पुस्तकरूपाने असेल, कधी पैशाच्या रूपाने असेल पण त्याने समर्थता येते का? नाही. समर्थता कधी येते? जेव्हा ती वस्तू ही पांचमहाभौतिकरित्या संतुलित असते, तेव्हाच तो आधार तुम्हांला देताना तुमच्यातील पांचभौतिक गोष्टींचे संतुलन राखणारा हवा. त्याशिवाय तो आधार, आधारच ठरत नाही. आजारावर दिले जाणारे औषध जर असे संतुलन राखणारे नसेल तर ते औषध देखील औषध ठरत नाही. औषधांचे side-effect का होतात? कारण प्रत्येकाच्या कार्यशक्तीला मर्यादा असतात.

    ज्याच्या कार्यशक्तीला मर्यादा नाही व मर्यादा नसूनही जो संतुलित आहे व available पण आहे, आणि आधार देण्यासाठी त्याला कुठल्याही condition ची सुद्धा गरज नाही असा तो एकमेव परमात्मा असतो.

    एखाद्या ठिकाणी आग लागली तर तिथे लोकांना वाचविण्यासाठीसुद्धा साधनांची आवश्यकता असते. पण तो जो एक आहे त्याला अगदी आग लागली असली तरी कुठल्याही साधनांची आवश्यकता नाही व आग विझवायची पण गरज नाही. असा तो एकमेव सर्वसमर्थ आहे. अशा ह्या सर्वसमर्थ परमात्म्याच्याद्वारे, ह्या एकाच्याच माध्यमातून आमचे चण्डिकाकुलाशी contact होऊ शकते, जे सर्वार्थसमर्थ आहे.

    पंचमहाभुतांना संतुलित ठेवणारा असा हा परमात्मा म्हणजेच सर्वसमर्थ व स्कंदचिन्ह (चण्डिकाकुलाचे स्थान) म्हणजेच सर्वार्थसमर्थ. सर्वार्थसमर्थ म्हणजे काय? तर प्रत्येक भक्ताचा परमात्म्याशी पूर्वीच्या जन्मांतील, आताच्या जन्मातील व पुढच्या जन्मातील असणारा संबंध सांभाळणारा, त्यामागची गणितं सांभाळणारा. हा परमात्मा भक्तांसाठी अत्यंत कनवाळू आहे. हा एक मागितले तर त्याच्या चारपट देत असतो व देताना इतर कुठलाही विचार करत नाही, हे त्याच्या आईला त्या विश्वमाऊलीला माहीत होतं.

    त्या चण्डिकेला माहीत आहे, जेव्हा आपला लेक त्याच्या भक्तांसाठी partiality करतो तेव्हा सृष्टीनियमांत असंतुलन घडते अशावेळी देखील त्याचा पुरुषार्थ जी सांभाळते त्या माय चण्डिकेचे क्षेत्र म्हणजेच सर्वार्थसमर्थ.

    "तो" म्हणतो "भक्ताधीन हे ब्रीद माझे" ह्या त्याच्या ब्रीद वाक्यामुळे भक्तांच्या प्रेमापोटी त्यांचा सर्व त्रास "तो" स्वत:वर घेतो आणि मुलाला त्रास होत असेल तर ते आईला कसे आवडेल? म्हणूनच भक्तांच्या प्रेमाला भुलणार्‍या "त्या"चा पुरुषार्थ सांभाळण्याचे काम त्याचे दादा, वहिनी, आई करतात.

    मग ह्याचा अर्थ आम्ही प्रथम आमचे नाते त्या देवीसिंहाशी जोडायचे, मग किरातरुद्राशी जोडायचे मग शिवगंगागौरीशी जोडायचे अशा क्रमाने जायचे का? नाही. तर मी जीवनात सगळं करत असताना प्रत्येक गोष्टीसाठी लागणारी currency म्हणजे हा मंत्र आहे. हा विश्वास कधी तुटू द्यायचा नाही. जेव्हा ज्याची आवश्यकता असते, त्यानुसार दत्तात्रेयांचे, हनुमंताचे सामर्थ्य आम्हांला ह्या मंत्रामधून मिळत असते.

    ह्या चण्डिकाकुलात दत्तात्रेय आहे, हनुमंत आहे, परमात्मा आहे, चण्डिका आई आहे, किरातरुद्र, शिवगंगागौरी आहे. इथे एकाला नमस्कार केला नाही किंवा नमस्कार करायला विसरलो तर काहीजण परत परत सगळ्यांना वेगवेगळा नमस्कार करतात असे करण्याची राजांनो खरंच आवश्यकता नाही.

    ३२ व्या अध्यायात आपण बघितले. चौघांपैकी एकच शहाणा असतो जो वणजायाने दिलेली चतकोर भाकर खातो. गुरुने "येतोस का?" विचारल्यावर "येतो" म्हणून सांगतो. गुरुने उलटे टांगूनही आनंदात आहे असे म्हणतो.

    "खरं सांगतो बाळांनों, गुरुक्षेत्रम्‌ जर आमच्यासोबत असेल तर आमच्यासारखे श्रीमंत आणि समर्थ जगात दुसरे कुणीच नाही."

    सत्ययुगात तेच मानव म्हणून जन्माला येऊ शकतात, ज्यांनी कलियुगात गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र स्वीकारला आहे. जे गुरुक्षेत्रम्‌ मंत्रांने पावन झाले तेच सत्ययुगात मानव म्हणून जन्माला येऊ शकतात. अनेक कल्पानुकल्पे जरी गेली तरी माझी काळजी घ्यायला हा मंत्र समर्थ आहे, कारण हा मंत्र ज्याने दिला आहे "तो" आपला शब्द कधीही फिरवत नाही.

    म्हणून एकदा का हा मंत्र घेतला की तुम्ही तुरुंगात पडलात म्हणून समजा. ज्याक्षणी तुम्ही हा मंत्र स्विकारला तेव्हा तुम्ही ह्याच्या बंधनात कायमचे अडकलात. समजा एखाद्या दारुड्याने देखील कधीतरी मनापासून एकदा तरी हा मंत्र स्विकारला असेल तरी त्याने अगदी २०० पापे केली, अगदी गटारात जरी गेला तरी तो गुरुक्षेत्रम्‌च्या बाहेर जाऊ शकणार नाही. आमच्यावर कितीही संकटे आली तरीही कुणीही आम्हांला गुरुक्षेत्रम्‌च्या बाहेर टाकू शकत नाही. प्रत्येक संकटावर, दु:खावर उपाय एकच तो म्हणजे गुरुक्षेत्रम्‌ मंत्र. तुम्हांला आता ह्याच्या तुरुंगाबाहेर जायची इजाजत नाही. तुम्ही अगदी स्वत:हून बाहेर जायचे ठरवले तरी तुम्हांला पाच संधी दिल्या जातील तरीही नाही ऐकले तर पाच तडाखे दिले जातील तरीसुद्धा नाही ऐकले तर जेवढे तुमचे आयुष्य उरले आहे, तेवढे मिनिटे बाहेर जायला permission मिळेल. गुरुक्षेत्रम्‌मधून बाहेर पडल्यावर राडा झालाच म्हणून समजा. हे आपोआप कळेल तरीही तुम्ही शहाणे नाही झालात तर मात्र "इदं न मम" तुम्हाला चावी देऊन "जा बाबा" म्हणून सांगितले जाईल.

    म्हणून गुरुक्षेत्रम्‌ मंत्र सोबत जर असेल तर भीती बाळगायचे काहीच कारण नाही. मंत्र म्हणत असताना चूका होऊ शकतात म्हणून घाबरुन जाऊ नका. सगळे शिकलेले नसतात. तुकाराम, जनाबाई, चोखामेळा शिकले होते का? त्यांच्यासाठी तो आलाच ना.

    गुरुक्षेत्रम्‌ मंत्राची भीती वाटण्याची बिल्कुल गरज नाही. मंत्र म्हणताना चुकून दुसरा विचार मनात येऊन मंत्र म्हणण्याचा थांबला तरी, जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर मी "तो" मंत्र तिथे पूर्ण करेन.

    माझी आई सर्वार्थसमर्थ आहे. तिच्यामुळे मी तुम्हांला ही gurantee देऊ शकतो. ह्या गुरुक्षेत्रम्‌मध्ये कुणाला ठेवायचे, कुणाला काढायचे हे काम माझ्या आईने माझ्याकडे दिले आहे आणि ह्या कामात आतापर्यंत मी कधीच चूक केली नाही. पुढचं मला माहीत नाही. मी ज्योतिषी नाही. माझ्याकडे एकच गोष्ट आहे, ते म्हणजे माझ्या आईचे प्रेम.

    ह्या तुरुंगाचा पहारेकरी मीच होतो, ह्यापुढेही मीच असणार त्यामुळे निर्धास्त रहा. इथून बाहेर पडायचा प्रयत्न केलात तर डोक्यात दंडुका मीच घालणार, पळण्याचा प्रयत्न केलात तर, गळ्यात लोढणं मीच अडकवणार, तुमच्या डोक्यात कुणी काही घालण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या डोक्यात काठीही मीच घालणार.

    आज आपण मंत्राचा पहिला भाग शिकलो. आज हा भाग आपला झालेला आहे.

    ॥ हरि ॐ ॥



                            

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

    ॥ हरि ॐ ॥
    श्रीगुरुक्षेत्रम्‌ मन्त्र, अंकुर मन्त्र त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आपण आहोत. हे पद खूप दिवस चालू राहू शकत ह्यात आपल्याला खूप काही शिकायच आहे. पुढच्या आठवड्यापासून मला इथे एक बोर्ड पाहिजे म्हणजे आपली शाळा सुरू झाली. ‘वर’ शद्ब आपण पुराणात वाचतो, ह्याला अमुक वर मिळाला त्याला तमुक वर मिळाला. त्यानंतर पत्रिकेमध्ये ‘वर आणि वधू’ मध्ये वर हा शद्ब आपण पाहतो. वर ब्रह्मर्षी देतात ते जे बोलतात ते खरं होतं. वरदान म्हणजे आपण म्हणतो ‘ह्याच्याकडे जन्मजात संगीताचं वरदान आहे.’ जन्मजात आहे म्हणजेच फार मेहनत करावी लागली नाही. मनुष्याला स्वत:ला काही मेहनत करावी न लागता जे सुंदर भव्यदिव्य मिळत ते वरदान असत. ऋषी तपश्चर्या करतात मग त्यांना वर मिळतो. तर काही ठिकाणी साध्याशा गोष्टींनी देव प्रसन्न होतो आणि वर देऊन जातो, एकाला दहा वर्षे तर एकाला एक दिवस. देव त्याच्या मनाला येईल तसे वागत राहतो. हा देव मोठा लहरी आहे. माझ थोड उशीरा आणि कमी भलं करतो तर इतरांच लवकर आणि जास्त भल करतो, हा देव काही सरळमार्गी नाही. हा मनाला येईल तस वागतो. पण तस कधीच नव्हतं, नसेल, आणि नाहीए.
     
    ‘वर’ शद्बाचा मूळ अर्थ मनुष्याच्या मानवी जीवनातील मानवी प्रयासाच्या मर्यादा जिथे संपतात जर ती व्यक्ती श्रद्धावान असेल तर तिथे परमेश्वराच्या सामर्थ्याचं connection आपोआप जोडलं जात. जेव्हा मनुष्याच्या प्रयत्नांमध्ये गुणात्मक जास्त गुणात्मक फरक पडणार नाही असे दिसते, तेव्हा चण्डिकाकुल, परमेश्वर आपोआप connection जोडून त्याला extra ताकद, यश देतात. म्हणजे जर पूर्वी १०० ग्रॅम प्रयत्नांना १० ग्रॅम यश मिळत होत, तिथे १० ग्रॅम प्रयत्नांना १०० ग्रॅम यश मिळते. हे connection केव्हा जोडल जात जोपर्यंत तुम्ही मानवी प्रयास पूर्णपणे मनापासून करता तेव्हा तो भगवंत connection आपोआप जोडतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला वेगळे नियम लावतात. कर्माचा अटळ सिद्धान्त सर्वांना समान असला तरी चण्डिकाकुल व तिचा पुत्र परमात्मा प्रत्येकाला वेगळे नियम लावतात त्यामुळे अनेक problems सुटतात.
     
    नेहमी पहिल्या आलेल्या व्यक्तीला पुढे न्यायचे ठरवले तर काय होईल? बाकीचे कधीतरी पुढच्या वर्गात जातील का? उदाहरण म्हणून मीनावैनी, चौबळ आजोबा ह्यांना जेवढे marks मिळालेत त्यांच्या पटीत mark मिळाले तर तुम्ही वर याल अस असेल तर कोणी पास तरी होईल का? म्हणून प्रत्येकाला तो वेगळे नियम लावतो. प्रत्येक मनुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या कालखंडानुसार वेगवेगळे नियम ती चण्डिका आणि तिचा पुत्र लावतात. फक्त दोनच गोष्टी fix असतात - १) कर्माचा अटळ सिद्धान्त आणि २) पावित्र्य हेच प्रमाण. ह्याला अनुसरुनच ते partiality करतात. ताकद असतानाचे नियम तुम्हाला ताकद नसताना लावले तर, लहानपणीचे नियम वयस्कर झाल्यावर लावले तर घोटाळे होतील. म्हणून स्वत:ची तुलना कधीही दुसर्‍याशी करू नका. परमेश्वराची कृपा दुसर्‍यावर किती झाली आणि माझ्यावर किती झाली ह्याची तुलना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ज्याला हिरा खरा का खोटा माहित नाही तो हिर्‍याची तुलना कशी करणार. आम्ही परमेश्वराची कृपा बघितली नाही. परमेश्वर बघण लांब राहिल तो अनंत आहे त्याला समजून घेण शक्यच नाही. आम्ही लहान आहोत म्हणून परमेश्वराला आम्ही कसे जाणून घेणार. तर परमात्म्याची कृपा आमच्या आयुष्यात कुठे कुठे आली ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आपल्याला कळायला लागल्यापासून आमच्या जीवनात किती सुंदर गोष्टी घडल्या हे आठवलं की आपोआप आम्हांला परमेश्वराची कृपा नीट समजू शकते. ह्याला योगायोग मानू नका. ह्या जगात योगायोग नसतो. कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते. संकट येऊन गेल्यावर बापरे ! सुटलो - आठवा. परमात्म्याची कृपा कशी होते हे बघण्यासाठी दुसर्‍यांच जीवन बघण्याची, मूर्तीकडे बघण्याची, मोठमोठे धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या. माझ्या जीवनात मी चुकीचे वागत असताना पण परमेश्वराने किती मला भरभरून दिले हे आठवा.
     
    पण मनुष्याचा मोठा problem हा आहे की त्याच्या स्मृती केन्द्रात जे मिळालं नाही, दु:ख प्रसंगाची नोंद जोरदार असतात. परमात्म्याने स्मृती दोन्ही गोष्टींची समानच दिलेली आहे. सुख म्हणजे काय तर आम्हाला मिळालेल सुख भागिले आमची सुखाची अपेक्षा. आमची सुखाची अपेक्षा अनंत असते. दु:ख म्हणजे काय तर आम्हाला असलेलं दु:ख भागिले दु:खाची अपेक्षा म्हणून दु:ख increase होत राहतं. मिळालेल्या सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. मिळालेल्या सुखाचा आनन्द आम्हाला परत-परत उपभोगता आला पाहिजे. मनुष्य नेहमी दु:ख परत परत जगत असतो.
     
    मृत व्यक्तीच्या आठवणी परत परत येतात. पण ssc पास झालो कि त्याचा आनंद परत साजरा करत नाही. Degree मिळाल्याचा आनंद नोकरी मिळविण्यात हरवून जातो. लग्नाचा प्रसंग आठवत नाही, पण नवर्‍याला बायको काय बोलली आणि बायकोला नवरा काय बोलला हे चांगल आठवतं. आईचे धपाटे आठवतात पण तिचं रात्रभर जागण आठवत नाही. जो पर्यंत ती गोष्ट असते तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत नाही. ह्या जगातील पहिली मूर्ती कशी घडली रेणूकामातेची घडली. आईवर निस्सिम प्रेम करणारा परशूराम पित्याच्या आणि मातेच्या देहाभोवती काष्ट रचलेली, अग्नी दिलाय ज्याक्षणी मातेचं मुख दिसल नाही तेव्हा त्याने दत्तात्रेयांकडे विनंती केली की एकदा मला माझ्या मातेला पाहायच आहे. आईला पाहून परमात्मा असणारा परशूराम धावत आईजवळ गेला. त्याने आईला स्पर्श करताच फक्त तिचं मुख राहिल त्यातूनच ही मूर्ती घडली. ह्या विश्वातील पहिली मूर्ती परमात्म्याच्या मातेच्या विरहामुळे घडली. आई-वडिल गेले की आम्ही रडतो.
     
    शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मुलांना मारून मुकटून आपण पाठवतो. हल्ली मुलांचे बालपण निघून गेलयं. तारुण्यात तारुण्याची शक्ती नुसती उधळली जाते. शरीर थकलं की माझं तारुण्य फुकट घालवलं म्हणून दु:ख करतो. ह्या प्रवृत्तीमुळे माणसाच्या स्मरणशक्तीत वेदनेची तीव्रता जास्त असते. वेदना खोलवर जाते. जे दु:ख आहे ते आहे. पण ह्याची माझी अपेक्षा शून्य नाही झाली तरी माझा सद्‍गुरु माझ्या दु:खापेक्षा मोठा आहे. मिळालेलं सुख पुढच्या वटवृक्षा एवढ्या सुखाचे बीज आहे हे लक्षात ठेवा. आपल्या स्मरणशक्तीला आपल्याला training द्यावं लागत. दुसर्‍याने केलेला अपमान पटकन आठवतो पण मान आठवत नाही. इथे चण्डिकाकुलाकडून मिळणारा वर आवश्यक असतो.
     
    तिने रामाला वर दिला. तिच्यासाठी प्रत्येकाला नियम वेगळा आहे. ती रामाचे नियम तुम्हाला लावत नाही. चण्डिका आणि तिचे पुत्र माणसांशी युद्ध करत नाहीत त्यांच युद्ध असुरांशी असत. हेच आपल्याला मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषद्‌ शिकवत. हे चण्डिकाकुल असूरांशी परिक्षा घेत मनुष्यांची परिक्षा घेत नाही.
     
    एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ।
     
    हा विश्वास मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषदाने दिला आहे. मनुष्याच्या चुकांमुळे वृत्रासूर उत्पन्न होतो. जो मनुष्य वाईट वागतो तो वृत्रासुराच्या प्रभावाखाली गेलेला आहे.
     
    जो नियम ती रामाला लावते ती तो नियम आम्हाला लावणार नाही. त्यामुळे ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं नाही. आम्हाला प्रपंच प्रेमाने करायचा आहे त्याबरोबर परमार्थातही प्रगती करायची आहे. माझ्या भावाचा, शत्रुचा नियम ती मला लावत नाही. म्हणून श्रद्धावानाच्या शत्रुचा पराजय होऊ शकतो. पण आमची अपेक्षा असते तिने जेव्हा आम्हाला पाहिजे तसे नियम तिने आम्हाला लावावेत. पण आम्हाला अक्कल किती? तिचे नियम कुठले ते माहित नाही. ती कृपा कशी करते? वातावरणात बदल कसे घडतात हे माहित नसतं. एखाद्या मोठ्या अपघातून मनुष्य वाचतो कसा? हे त्याचं काम आहे, हे तोच करू शकतो आणि त्यासाठी त्याठिकाणी धावत जायची गरज नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. खेळ समजण्यासाठी खेळ बघावा लागतो, त्याचे नियम समजून घ्यावे लागतात. पण त्याचा खेळ बघणार कुठे कुठे? मग समजून कसा घेणार? डॉक्टर सांगतात ह्या मनुष्याच्या जीवनाचे दोन तास उरलेत तो मनुष्य दहा वर्ष संसार करतोय. ही परमात्म्याची लीला आहे. म्हणून शांतपणे एकच गोष्ट करायची, तिने सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं -
     
    "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते."
     
    तुमच्यासाठी ती चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा परशूराम पण हे वाक्य उच्चारतो. म्हणजे रामासाठी फक्त एक चण्डिका आईच हे वाक्य उच्चारते. श्रद्धावानासाठी ती चण्डिकाही हे वाक्य उच्चारते आणि परशूरामही सगळ्या श्रद्धावानांच्या कानात सांगतो. आम्ही अवतारांपेक्षा डबल भाग्यवान आहोत म्हणून लक्षात ठेवा सामान्य श्रद्धावान भक्ताकडे अवताराच्या दुप्पट ताकद असते. तुमच्यासाठी चण्डिका आई आणि परमात्मा दोघेही वचन देतात. त्याच्याजवळ एक वरदान आहे तुम्हाला दोन वरदान आहेत.
     
    तुम के प्रेमु राम के दुना
     
    जन्मत: चण्डिकाआईच एक वरदान आहे - "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते"  ज्याक्षणी देवयान पंथावर प्रवास सुरु करतो तेव्हा परमात्मा आमच्यासाठी उच्चारतो. ही दोन वरदान तिनेच दिली आहेत. तिने कानात सांगितलीत, परशुराम आम्हाला ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल बापू आमच्यासाठी काय आकाशवाणी होणार का? आकाशावाणी कोणासाठी होते - कंसासाठी तुम्ही काय कंस आहात का? त्यापेक्षा प्रेमवाणीचा स्विकार करा. आम्ही हे वाक्य कोणाच्या तोंडून ऐकलय ते लक्षात ठेवा. आम्ही हे वाक्य ऐकलयं हेही आठवत नसेल तरी काही नाही. कारण वासरू रस्ता चुकलं तरी गाय चुकत नाही. शिष्याला एकदा आपल म्हटल त्याचा मार्ग नरकात जाणारा असेल तरी हा नरकात जायला तयार असतो. आम्हाला नरक नाही हे आम्हाला माहित पाहिजे. कारण -
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    आमचा रस्ता नरकाकडे जरी जात असला तरी तिथे साई येऊन उभा राहिल. आणि जिथे साई उभा आहे तिथे नरक असूच शकत नाही. आम्हाला जी प्रारब्धाच्या नियतीची भिती दासी आहे ती नियती चण्डिकेची यत्किंचित दासी आहे.
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आज तुम्हाला decleare करतो जे अग्रलेख नीट वाचतात त्यांना आठवते का ते बघा तो देवीसिंह पाठीवर स्कंदचिन्ह घेऊन फिरतो. तिथेच एक शद्ब येतो श्वास शद्ब होता. ‘श्रीश्वास’ हा शद्ब नीट लक्षात ठेवा. हा आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे सहजतेने, प्रेमाने आणि पूर्णपणे कसा? त्याच्याविषयी मला माहित नाही. जेव्हा मला माझी आई सांगेल की आता ‘श्रीश्वास’ सगळ्यांना द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी declare करेन, पण त्यासाठी तिने मान हलवली पाहिजे.
     
    ॥हरि ॐ॥

     

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

    ॥ हरि ॐ॥
     
    आज हनुमन्त पौर्णिमा आहे त्याचबरोबर आदिमातेच्या उत्सवाचा दिवसही आहे. भारतात सगळीकडे आज महिषासुरमर्दिनीच्या देवळांमध्ये जत्रा असतात. असा हा आजचा पवित्र दिवस आहे आणि त्यात आज गुरुवार आहे.
     
    मनात अनेक विचार येत असतात. जो विचार नको असतो तो मनात येतो आणि हवा असणारा विचार येत नाही. ही परिस्थिती ह्या स्वस्तिक्षेम संवादामुळे नाहिशी होते. नको असलेला विचार येणे आणि पाहिजे तो विचार न येणे म्हणजे तुमचा फोकस नाही. तुमच्या बुद्धीचा मनावर control नसतो. आदिमातेची अठरा प्रभावकेंद्रे प्रत्येक मानवाशी जोडलेली असतात. प्रत्येक मनुष्य १४ वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र होतो तेव्हा कोणतं connection तोडायचं आणि कोणतं जोडायचं ह्याचं स्वातंत्र्य त्याला असतं. ही १८ connections आम्हाला ह्या संवादातून जोडून मिळतात. weak connections नां जास्त power देण्याचं काम गुरुक्षेत्रम्‌ मध्ये होतं.
     
    आजचा दिवस अंजनामाता आणि आंजनेय हनुमन्त ह्या दोघांचाही दिवस आहे. आजचा दिवस असा आहे जो चण्डिकेचाही आणि तिच्या पुत्रांचाही आहे. म्हणूनच ह्या पवित्र दिवशी श्रीस्वस्तिक्षेम संवाद साधताना जीवनात आतापर्यंत जे काही चांगलं मिळालं आहे ते आठवायचं आणि शेवटी ‘मी अंबज्ञ आहे’ असं म्हणायचं.
    आज आपल्याला आद्यपिपादादांचे अभंग ऐकायचेत आहेत. पहिला अभंग अतिशय सुंदर आहे.
     
    ‘इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश । प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण’
     
    आरशात प्रतिमा दिसते पण आरशाला कोणी विचारत नाही. इंद्रधनुष्याच्या नादात आकाशाला विसरतो. जे महत्त्वाचे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष कमी वेधलं जातं. मूळ गोष्टीत मनुष्य जास्त interest घेत नाही. शेवटी ज्या मूळ गोष्टीमुळे इतर गोष्टी मिळतात तिला विसरलं तर इतर गोष्टी कशा मिळणार? 
    समजा एक स्त्री सुंदर स्वयंपाक बनवते नवर्‍याला सगळं काही त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याचबरोबर घरातील इतर कामेही व्यवस्थित करते. पत्नीपासून मिळणार्‍या लाभात तो नवरा interested आहे पण तिच्यावर पत्नी म्हणून प्रेम करण्यात तो interested नाही. मग ती काय तुमच्या घरची मोलकरीण आहे? पत्नीपासून मिळणारे लाभ तिच्या पत्नीत्वामुळे मिळतात.
     
    मूळ गोष्ट राखावी लागते, तर बाकीच्या गोष्टी मिळतात. आम्हाला एखादी वस्तू दिसते आहे. ती का दिसते? त्या वस्तूवर प्रकाश पडल्यामुळे दिसते आहे. पण नुसता प्रकाश असून चालेल का? जर तुमच्याकडे बघण्याची क्षमता नसती तर ती दिसली असती का? तर सगळ्या महत्त्वाची important  गोष्ट आहे बघण्याची शक्ती जी देवाने तुम्हाला दिली आहे.
     
    जीवनात जे दिसतं त्याच्या प्रतिमेत आम्ही अडकतो. आरसा स्वच्छ ठेवला नाही तर तो प्रतिमा दाखवेल का? स्वार्थ साधण्यासाठी तरी भगवंताला विसरलो नाही तरी भगवंताशी जोडून राहतो.
     
    हे अभंग हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत. हे सगळ्यांच्या जीवनात जे काही घडलंय तेच सांगतात. साधी उदाहरणं दिली आहेत. जे साधं असतं तेच बेस्ट असतं. सगळ्यात बेस्ट गोष्टच सगळ्यात साधी असते हे मानवी मनाला पटत नाही आणि पटेपर्यंत जायची वेळ जवळ आलेली असते. साध्यासुध्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत आणि सगळ्यात बेस्ट आहेत.
     
    ॥ हरि ॐ ॥
     
  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

    ॥ हरि  ॐ॥
     
     
    साडेतीन मुहूर्तामधील एक पवित्र दिवस, सर्वात श्रेष्ठ दिवस ह्या दिवसातला क्षण न क्षण पवित्र, सुंदर, शांती समाधान देणारा मानला जातो. अतिशय सुंदरपणे पवित्र भावाने आज स्वस्तिक्षेम संवाद साधायचा आहे. जे तिच्याशी बोलायचं आहे ते तिला अतिशय सौम्यपणे सांगा. ह्या सुंदर दिवसाचं पावित्र्य जपत संवाद साधुया.
     
    आज आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या सुंदर पदाला - 
    ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’. 
    तशी सगळीच सुंदर आहेत आपण ह्या मोठ्या आईचं पद पाहायचं आहे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ‘रामवरदायिनी’ ह्या एका शद्बामध्ये काय आहे हे लक्षात येतं. ह्याचा मूळ अर्थ रामाला वर देणारी हा आहे. ह्यात सात अक्षरे आहेत. हे नाव खूपच वेगळे आहे. कारण हा तिचा अवतार पण वेगळा आहे. हा सहावा अवतार आहे.
     
    तिचं मूळ नाव काय आहे - महिषासुरमर्दिनी. हे नाव कसं आहे जो महिषासुर आहे, त्याचा नाश करणारी म्हणजे तिचं मूळ नाव नाहीच. तिचं अस्तित्व म्हणजेच महिषासुराचं अनस्तित्व. अशीच ती रामासाठी युद्धभूमीवर प्रकटली कारण रावण मरत नव्हता म्हणून आणि काकासुर आलेला आहे. हा काकासुर कोण आहे, आपण मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये बघतो, हा शुंभाचा पुत्र आहे. प्रेमप्रवासमध्ये आपण पाहिलंय रावण म्हणजे काय? इथे लक्षात घ्यायचं आहे  हे असं स्वरूप आहे ज्या रूपात तिने एक मोठं समीकरण घातलेलं आहे आणि सोडवलेलंही आहे. राम वर आधी ‘रा’ आणि नंतर पुन्हा ‘र’ आणि मग ‘दायिनी’ ‘श्री’ बाजूला काढून आपण ‘रामवरदायिनी’ कसं फोड करून लिहिणार - र + आ + म + व + र + द + आ + य + इ + न + ई. ‘न’ चा ‘ण’ कसा होतो तर ‘र’ च्या सान्निध्यात ‘राम’ नाम तसंच आहे पण ‘रावण’ नावाचा तिने चोळागोळा केलाय, त्याला उलटंपालटं केलयं. म्हणजेच तिच्या ह्या नामात ज्याच्या हातून शत्रूचा नाश करायचा आहे आणि ज्याचा नाश करायचा आहे, ज्या शत्रूचा नाश करायचा त्यांची नाव आहेत. जो शत्रू आहे, त्याचं नावसुद्धा तुकडे तुकडे करून आपल्या गर्भात तिने ठेवलेलं आहे. ही रामवरदायिनी रामाला वर देणारी आहेच आणि ती प्रत्येक मनुष्यालासुद्धा बेसिक सांगते की ‘रामनाम’ हेच नाव रावणाचा नाश करण्याचं महत्वाचं शस्त्र आहे. सर्व श्रद्धावानांना दिलेला वर आहे. ह्या नामात रावणाला मारणारा ‘राम’ आहे, तुकडे तुकडे झालेला, खंडित झालेला ‘रावण’ पण आहे आणि ‘ईकार’ ही आहे ‘ईकार’ म्हणजे ‘शक्ती’. रामानामात तिची स्वशक्ती आहे, ती धारण करून तिने अवतार घेतलेला आहे आणि रामाकडून तिने रावणाला मारविले आहे. तुमच्या जीवनात रावण आला तर घाबरायचे कारण नाही.
     
    ही रामवरदायिनी ह्या मन्त्रामध्ये तिच्या नामासकट रावणाचा वध होऊन बसलेली आहे. म्हणून आरतीत काय आहे? आरतीत आपण काय म्हणतो - ‘षष्ठीते श्रीरामवरदायिनी । अशुभनाशिनी रक्ष चण्डिके ।’ सध्या शुभंकरा नवरात्र सुरू आहे. ह्या नवरात्रीला ‘शुभ’ का म्हणतात. रामाचा जन्म झाला त्यावेळी ही नवरात्र संपते म्हणून. अश्विन नवरात्रीला रावणाचा मृत्यू झाला म्हणून ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. ही आदिमाता शुभंकरा असताना, अशुभनाशिनीही आहे. त्यासाठी तिने दोन टोकाची नामं धारण केली आहेत. तो जो कोणी शत्रू आहे, त्याचं नाव तिने मूळनाव म्हणून धारण केलं आहे. जो शत्रूचा नाश करणारा आहे त्याला वर देणारी आहे. तिने तिच्या मूळ धर्माला अनुसरून नाश केलेल्या शत्रूचं नाम धारण केलं आहे. हे नाव ह्या मन्त्रात आलं त्याचं हे background आहे. हेच इथे फिट आहे. ह्या मन्त्राचा (गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा) प्रत्येक शद्ब प्रचंड मोठी समीकरणं सोडवणार आहे तुमच्या नकळत.
     
    आपलं शरीर असंख्य अणूंनी बनलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असंख्य पेशी आहेत, केमिकल्स आहेत, असंख्य अणू आहेत. अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन च्या पुंजक्यांनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं अख्ख शरीर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन ह्यांचे पुंजके आहेत. हे नातं महाप्राण maintain करतो, त्याला प्रेरणा अंजनामाता म्हणजे आदिमाता देत असते. प्रत्येक अणूला टिकवून हनुमन्त धरतो. त्याला चालना चण्डिका देते. एका अणूचं रूपांतर दुसर्‍या अणूत होतं ते ती करते. सगळी रचना तिचीच आहे. म्हणजे आम्ही पापं करतो ते आदिमाता करते का? वस्तूचे कण आहेत तसेच विचारांचे कणही आहेत. ह्या कणांना इच्छा शक्तीची मोकळीक तिने दिलेली असते, त्यात ती ढवळाढवळ करत नाही, आणि तिच्या मुलांनांही ती ढवळाढवळ करू देत नाही.  माझ्या इच्छा, विचार, निवड चुकली तरी त्या विचारकणांवर माझीच सत्ता चालत असली, त्यांना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असलं तरी, त्याचात बदल करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. चुका करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यात आहे, आणि चुका दुरूस्त करण्याचं सामर्थ्य चण्डिकाकुलात आहे. तुमच्या चुका लक्षात आल्या तर जसे जमेल तसे नामस्मरण करायला सुरुवात करायची, चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागायचं त्यांना आवरण्याची सत्ता तिला आहे.
     
    लहानपणी भोवरा फिरवलात त्याला नुसती दोरी बांधून चालेलं का? नाही. त्यासाठी skill यावं लागतं. सुरुवातीला ते येत नाही पण नंतर प्रॅक्टिसने ते येतं. मग तो भोवरा कसा फिरवायचा ते स्वातंत्र्य आहे. पण त्याच वजनाचा ठोकळा दिला तर तो फिरेल काय? नाही कारण तो भोवरा नाही. जेवढी तुमची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती महत्त्वाची आहे, तेवढचं वस्तुमानही महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, भोवरा चुकीच्या ठिकाणी आपटत असू तरीही त्या आदिमातेने आमच्या हातात भोवरा तर दिला आहे. विचार करणार्‍या मेंदूच्या पेशी तिने दिलेल्या आहेत. त्यांना चालना देण्यासाठी ती अंजनामातारूपाने सुप्तावस्थेत असते, आणि तिचा पुत्र महाप्राण शरीरात असतो. देवीसिंह युद्ध कसं करतो हे आपल्याला माहीती आहे, माझ्या विचारांना तुझ्या चरणांवर सोपवलं आहे, हे त्या देवीसिंहाला सांगावं लागतं. ज्या क्षणाला तुम्ही त्याला हे सांगता, तेव्हा तो मेंदूतल्या योग्य पेशींना प्रेरित करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी ती उचित नसेल तर तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुमचे चुकीचे विचार लगेच थांबतात. तुमच्या रस्त्यात तो आडवा येतो, त्यामुळे तुम्हाला हवीशी वाटणारी गोष्ट तो प्रेमाने दूर करतो आणि तुम्ही म्हणता देव माझ्याशी किती कठोर वागतो.
     
    अनिरुद्धावरचा विश्वास, गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावरचा विश्वास, आणि त्याच्या आईवर तुमचं प्रेम असेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. ती स्वत: गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रात आमच्यासाठी एकाच वेळी शुभंकरा आणि अशुभनाशिनी बनून आलेली आहे, ती श्रद्धावानांसाठी आधी शुभंकरा नंतर अशुभनाशिनी किंवा आधी अशुभनाशिनी आणि नंतर शुभंकरा नसते. ती एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडवून आणते.
     
    हा देवीसिंह जो आईच्या समोर तोंड करून उभा आहे तो कसा आहे? सगळीकडे देवाचं वाहन देवाकडे तोंड करून बघत असतं. पण हा एकच असा आहे जो त्या आदिमातेसमोर जो कोणी उभा आहे त्याच्याकडे तोंड करून नेहमी attenation position मध्ये तो असतो. हा तिच्याकडे जो कोणी बघताहेत त्यांच्याकडे बघतोय. तिच्यासमोर कोण येतो त्यांच्याकडे हा बघतो. महिषासुरासारखा आदिमातेचा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा झेप घ्यायला तयार आहे आणि प्रेमळ भक्त असेल तर त्यांच्यावरही हा झेप घ्यायला तयार आहे पण कशासाठी त्यांच्यामागून येणारा शत्रू, संकट ह्यांचा नाश करण्यासाठी. मनुष्य देवाकडे धावत केव्हा येतो, जेव्हा तो संकटात येतो. हे एकमेव दैवत असं आहे, श्रद्धावानांकडे तोंड करून attention मध्ये उभा आहे. ‘युगे अठ्ठावीस उभा’ कुठल्याही क्षणी झेप घेण्यासाठी तो तयार आहे. आदिमातेचा शत्रू असेल तर त्याचा नाश करण्यासाठी झेप घेतो, आणि श्रद्धावान भक्तावर त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी  झेप घेतो. उपनिषद्‍ मध्ये शेवटचा अध्याय परशुराम आणि त्रिविक्रमाचं  नातं सांगतो.
     
    ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा प्रत्येक शद्ब फार वेगळी वेगळी समीकरणं सोडवत राहतो. ह्या पदातली सगळी प्रमुख समीकरणं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मन्त्रातील सगळी समीकरणं तुमच्या जीवनातील सगळ्या problems ची समीकरणं सोडवतील. चुकीच्या गोष्टीचं निराकरण, पापाचा नाश, अयोग्य ते नाश करणं, कमी आहे ते भरून करण्याची ताकद तुमच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट देणारा आहे. गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र समीकरण नाही तर तुमच्या जीवनात जे problem आहेत, समीकरणं आहेत त्याचं प्रत्येक  solution ह्या मन्त्रात आहेच.
     
    पुढच्या वेळेस आपण ह्या सात अक्षरांबद्दल शिकणार आहोत. आजच्या शुभंकरा नवरात्रीपासून आपण सुरुवात केली आहे. आपल्याला आनंद करायचाय, हया गंगेत डुबक्या मारायच्या आहेत. तुम्ही ह्यात बुडणार नाहीत हे लक्षात ठेवा. ह्या मन्त्राने अवगाहन करायचं आहे. आता आपल्याला हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा समीकरण सोडवत जातो ते पहायचं आहे. हे बरेच दिवस चालणार आहे. काळोखात चालत असताना माणसाचा हात धरलाय ज्याला पाऊल वाट माहितेय, तरी भीती वाटतेच की पायाखालून साप किंवा आणखी काय गेलं तर, पण जर प्रकाश असेल आणि bodygaurd पण बरोबर असेल तर भीती कसली? ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावर खूप प्रेम करा, प्रेमाने हा मन्त्र म्हणा. ह मंत्र तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा निर्माण झाला व कोणी प्रथम म्हटला, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या आयुष्यात नाही तर, प्रत्येक आयुष्यात अनुभवायचं आहे.
     
    ॥ हरि ॐ ॥
 
 
  1     2     3     4     5  
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 6 Apr

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Anubhavs