1     2     3     4     5  

Excerpts

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०७ .०६ .२०१२)

     ॥ हरी ॐ॥

        आपण गुरु म्हणजे काय? हे समजून घेतलं, क्षेत्रम्‌ बद्द्ल आपण बोललो होतो का? कुणाला आठवते आहे का? मी expect करत नाही की सगळं तुम्हाला आठवेल, फक्त गुरुक्षेत्रम्‌ मंत्राबद्दल बोललो एवढं आठवलं तरी पुरे झालं.
        क्षेत्र ह्या शब्दाचे दोन अर्थ होतात एक म्हणजे area आणि दुसरा म्हणजे शेत. क्षेत्रम्‌ म्हणजे काय तर गुरुचे शेत. बघा शेती करताना ज्याचे शेत असते तोच पेरणी करेल असे नाही. कधी-कधी दुसर्‍याला contract दिले जाते. पण इथे असे नाही. गुरुच्या शेतात शेती करणारा खमक्या आहे, तो कुणालाच त्याच्याशिवाय शेती करायला chance देणार नाही.
        हे गुरुचे क्षेत्र आहे कुठे? आपण व्यवहारात म्हणतो हे त्याचे क्षेत्र आहे म्हणजे काय तर प्रत्येकाला व्यवसायानुसार कुणाचे अभिनय क्षेत्र असते, कुणाचे वैद्यकीय क्षेत्र असते. प्रत्येकाचे क्षेत्र हे वेगवेगळे असते.
        पण इथेही एक गोष्ट महत्त्वाची आहे, जरी दहा जणांचे एकच क्षेत्र असले तरी त्यात सगळेच expert नसतात. अभिनय क्षेत्रात आपण बघतो बरेच जण असतात पण त्यातील सगळेच expert असतात का? नाही. म्हणजे इथे काय आवश्यक असतं? तर कौशल्य.
        म्हणून क्षेत्राचा अर्थ काय होतो? कर्मभूमी. मग आता गुरुचे शेत म्हणजे काय? गुरुची कर्मभूमी म्हणजे काय? हे आपल्याला बघायचे आहे.
        आपण वारंवार बोलताना ऐकतो, "कर्मात काय लिहिले माहीत नाही." "पोराने काय कर्म केले आहे माहीत नाही",  "कर्म" शब्द बर्‍याच वेगवेगळ्या अर्थाने वापरला जात असला तरी, जास्त करुन कर्म म्हणजे "नशीब" ह्या अर्थाने तो प्रचलित असतो.
        काही जणांना कपाळावर हात मारुन घेण्याची सवय असते. ही अतिशय चुकीची गोष्ट आहे. कपाळावर हात मारण्याचे ताबडतोब थांबवा. त्याचे कारण मी पुढे सांगेन.
        कर्म म्हणजे दोन गोष्टी येतात त्यातील १)क्रिया  ( कर्म करतो ती क्रिया व कौश्ल्य)
     व २) नशीब. ह्या जन्माच्या क्रियेतून पुढचे नशीब किंवा गतजन्माच्या क्रियेतून पुढील जन्मांचे नशीब ठरत असते. अशा ह्या नशीबावर खूप काही अवलंबून असेलही पण -


    "एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा ! परि हरि कृपे त्याचा नाश आहे !"


    कितीही कठीण किंवा वाईट प्रारब्ध असले तरी हरिकृपेने त्याचा नाश होतो.

     कर्मावर उतारा कर्म हाच असतो. कर्माची treatment कर्म हीच असते.
        पण ह्यासाठी आधी काहीतरी करता तर आले पाहिजे. एखाद्या स्त्रीने कधी स्वयंपाकघरात प्रवेशच केला नसेल तर ती श्रीखंड कशी बनवू शकेल. एखाद्याला फोटोग्राफी करायची आहे, पण कॅमेरा कसा धरायचा हेच माहीत नसेल तर तो फोटोग्राफी कसा करेल?
        म्हणजेच, कर्म हा मनुष्य सहजतेने शिकत जातो, परंतु कर्माचे कौशल्य प्रयासानेच मिळत असते. लहान मुले बोलायला, चालायला सहजतेने शिकतात पण त्याचे skill त्यांना शाळेत जाऊनच develop करावे लागते. कर्म करणे ही सहज गोष्ट आहे पण कौशल्यासाठी मात्र प्रयास आवश्यक असतात.
    शाळा म्हणजे काय? तर शाळा ही तुम्हांला काम चांगल्या रितीने करायला तीन प्रकारे शिकवते -
    १)    जे तुम्ही करु शकता ते अधिक चांगल्या रितीने शिकविणे
    २)    जे तुम्हांला करता येत नाही ते करायला शिकविणे
    ३)    जे केल्याने हानी होऊ शकते, त्याबद्दल सावधान करणे
        शाळा आली की शिक्षक आलाच. हेमाडपंत सांगतात, "काय गोड गुरुची शाळा"
        जर तुमचा शिक्षक साधा असेल तर ती गोड शाळा होणार नाही. शाळेच्या बाबतीत शिक्षकांनी चुकांसाठी दिलेला मार, मित्र, मैत्रिणी सोबतचे क्षण सगळे आठवत असते पण तरीही तुम्ही ती शाळा सोडून पुढे कॉलेजमध्ये जाताच ना? जर ती शाळा गोड असती तर ती तुम्ही सोडली असती का? खरं गोड काय? तर जे कायमचे गोड आहे ते. जे आज गोड आहे, उद्या गोड आहे, कालही गोडच होते, तेच खरे गोड.
                            "मधुराधिपते अखिलं मधुरं!"
        म्हणून फक्त गुरुची शाळाच गोड आहे तुम्ही शाळेत जाता कशासाठी? आज ज्या तीन गोष्टी बघितल्या त्यासाठीच. ह्या तीन गोष्टी प्रत्येक क्षणाला आपल्याला जीवनात उतरवायच्या असतील तर त्यासाठी गुरुच्या शाळेत असणे आवश्यक आहे.
        गुरुचे क्षेत्र म्हणजेच गुरुची शाळा पण गुरु काय सगळ्यांसाठीच शाळा बांधू शकणार नाही. त्यासाठी काय पाहिजे? तर जागा पाहिजे.
        सद्‌गुरुकडे प्रत्येकाची line वेगळी त्यामुळे गुरुच्या शाळेची देखील प्रत्येकासाठी जागा वेगळी. तुम्ही जिथे जागा द्याल तिथे तो शाळा बांधणार, गुरुकुल बांधणार. गुरुला शाळा बांधण्यासाठी द्यावे लागते ते म्हणजे तुमचे मन. मनातील थोडीशी जागा गुरुला द्यायची.
        मानवाचे मन अफाट असते. त्यात खड्डेही खूप असतात म्हणून त्याला सांगायचे, "तुला पाहिजे ती जागा  तू निवड व पाहिजे तेवढी जागा तू घे." आम्हाला मग टेन्शन येते, गुरुने भलतीच जागा घेतली तर? तुमच्या मनात तुमच्या बायकोसाठी, तुमच्या आई-वडिलांसाठी, तुमच्या मित्रांसाठी, तुमच्या शत्रुंसाठी वेगवेगळ्या जागा असतात.
        गुरु तुमच्या मनातील कुठली जागा निवडेल? तर जी जागा तुम्ही कोणालाही दिली नाही ती. अशी रिकामी जागा गुरुला हवी असते. केवढी जागा गुरुला हवी असते? तर तुमच्या कपाळाची size आहे तेवढी. अशी जागा एकतर तुम्ही द्यायची किंवा त्याला निवडायला सांगायची.
        पण एकदा गुरुला दिलेली जागा ज्याक्षणी तुम्ही दुसर्‍यांना द्यायचा विचार करता तेव्हा त्याचक्षणी गुरु ती जागा सोडून देतो. एवढा हा सरळमार्गी भाडेकरू आहे. तुम्हाला देण्यासाठीच तो तुमच्या जागेत येऊन राहत असतो. तो तुम्हाला शिकवितो, पगारही घेत नाही वर तुमचा नफा करुन देतो. असा सर्वार्थाने तुमचा फायदा करून देणारा तो एकच.
         समजा तुम्ही एखाद्या दगडाला मनापासून गुरु मानले तर त्या दगडाची जागा तुमच्या मनात सद्‌गुरुच घेईल. पण इथे भाव मात्र खरा हवा.
        खरा भक्त कुठेही असला अगदी वाळवंटात, जंगलात किंवा खोट्याबुवाकडे जरी असला तरी गुरु त्याला सांभाळतोच.
        आपले कपाळ म्हणजेच विधीलिखित नशीब. म्हणजेच आपल्या नशिबा एवढी जागा गुरु मागत असतो. अशी जागा मागणारा त्याच्यासारखा तो एकच. आम्ही म्हणतो, आमचं नशीब फुटकं आहे, असं असलं तरी तुमच्या नशिबावर शाळा कोण बांधतो, तुमचा सद्‌गुरु. एकदा का तु्मच्या नशिबावर येऊन सद्‌गुरु थांबला की मग भीती कसली ?


            "एक विश्वास असावा पुरता ! कर्ता हर्ता गुरु ऐसा !!’


        साईसच्चरितातील चार मित्र व एक वणजारी ह्यांची कथा आपल्याला माहित आहे. चौघे जंगलात सगळीकडे फिरतात व परत आधीच्याच स्थानावर येतात, पण त्यांच्यातील एकालाच अक्कल येते. पुन्हा पुन्हा चूका करून फिरून आपण त्याच स्थानावर येतो तेव्हा आपण २५%च सुधारलेले असतो.
    फिरुन त्याच ठिकाणी आल्यावर गुरुने दिलेला भाकरतुकडा खाल्ल्यावर गुरुने काय विचारले? , "येशील काय मज संगती?" इथे "ये’ म्हणून नाही सांगितले. हेच ते कर्मस्वातंत्र्य. जायचे की नाही हे तुम्ही ठरवायचे. बाकीचे तिघे नाही गेले, फक्त साईनाथ गेले. गुरुने काय केले? साईनाथांना अलगद विहिरीत उलटे सोडले, नाका तोंडात पाणी जाणार नाही असे उलटे लटकवले. नंतर जेव्हा वर काढल्यावर विचारले, "कसे वाटले?" तेव्हा साईनाथांनी "आनंदात होतो" म्हणून सांगितले.
    गुरुने उलटे टांगणे म्हणजे नक्की काय? आपण नेहमी म्हणत असतो, "सगळं सुलट्याचे उलटे झाले म्हणून." करायला जावे एक आणि झाले भलतेच.
        गुरुकडे आल्यावर तो काय काम करतो? तर तुमच्या वाटेत काटे पसरतो. काटे का पसरतो? कारण तोच शिकवतो कट्यांवरून चालायला.
    ज्याने गुरुला त्याच्या मनात जागा दिली आहे, त्याला तो हे काटे बाजूला सारुन चालायला शिकवतो व जेव्हा असे चालणे शक्य होत नाही तेव्हा तो त्या भक्ताला उचलून धरतो. हा काटे का पसरतो? तर त्याची इच्छा असते की, जे काही तुमच्या प्रारब्धात आहे ते काट्यावर निभावून जावे.
    काटे कुठे टोचतात? तर पायाला व ते ही अगदी सूक्ष्म प्रमाणात. त्याचप्रमाणे सुरीही लागते, तीसुद्धा टोचतेच. बंदुकीची गोळीही लागू शकते. छोट्या काट्यांपेक्षा ह्याने होणारी इजा जास्त असते. अशा गोष्टी टाळण्यासाठी, की ज्याने तुम्ही अपंग होऊ शकाल, तुम्हांला injury होऊ शकेल, तो काटे पसरत असतो.  हे काटे तो कसे पेरतो, तर तो तुमच्या त्वचेची क्षमता बघुनच. हे काटे टोचल्यावर त्याला बघायचे असते, की तुम्ही काय करता?
        "काय रे हे साईनाथा!" म्हणता,की "वाचव रे साईनाथा" म्हणता, की .......साईनाथा ****  म्हणून शिव्या घालता. जेव्हा तुमच्याकडून शिव्या येतात, तेव्हा लगेच तो त्याची जागा सोडतो. ही परीक्षा तो का घेतो? तर तुमचा अभ्यास झाला आहे की नाही हे बघण्यासाठी. त्याचे काटे टाकणे म्हणजे संकट नव्हे तर जे काही त्याने शिकवले ते तुम्हांला किती समजले हे बघून अधिक चांगले देण्यासाठी.
        आमच्यावर प्रारब्धामुळे संकटे येतात. पण problem नाही कारण माझा सद्‌गुरु माझ्या संकटांपेक्षा मोठा आहे. पण जेव्हा संकटे येतात आणि मार्गही सापडत नाही, संकटांवर उपाय सापडत नाही म्हणजे आपण आपल्या मनाची गुरुला दिलेली जागा तेव्हा काढून घेतली. मग अशा वेळी गुरुला परत परत यायला सांगायचे. असे सांगितल्यावर तो दुप्पट जागा घेतो का? नाही.
    खरं सौंदर्य आहे, आपण त्याला सांगायचे - माझे आख्खेच्या अख्खे मन तू घे, माझं न- मन (नमन) होऊ दे.
     त्याने मागितलेली जागा आपण त्याला द्यायला शिकुया. आपल्या मनातील गुरुला दिलेली जागा म्हणजेच नशीब, गुरुक्षेत्रम्‌ कसे होते ते आज आपल्याला बघायचे आहे.
    आपण गुरुला वारंवार आपल्या मनातील जागा घ्यायला सांगितले पाहीजे , का ? तर आम्ही जी त्याला जागा देतो ती आम्हांलाही माहीत नसते की, आम्ही त्याच्याकडुन परत कितीवेळा काढुन घेत असतो .
    आपली रोजची प्रार्थना करताना अनेक वेळा टाळाटाळ होत असते आता नको नंतर असे करत आपण करत नाही, हे गुरुला नक्कीच कळत असते. असे जर आपल्याकडुन परत परत घडत असेल तरी घाबरण्याचे कारण नाही.
    ह्यासाठी एक सोपा उपाय आहे तो म्हणजे सकाळी उठल्यावर त्याच्या चरणांवर आपले कपाळ म्हणजे आपल्या नशिबाची जागा ठेवायची . आणि सांगायचे , " तुझ्या चरणांवर माझे कपाळ ठेवतो आहे म्हणजे हे क्षेत्र तुझे झाले . इथे मनातही तेव्हा तोच आदराचा व प्रेमाचा भाव असला पाहीजे . त्याच्याविषयी आत्यंतिक विश्वास असायला हवा. त्याशिवाय मार्ग सुटत नाही.
        गुरुची कर्मभूमी कुठे असते? तर तुमच्या मनात. दुसर्‍याच्या मनाची कर्मभूमी तुम्हांला मदत करु शकत नाही. जर आम्ही त्याला जागा दिली नाही तर गुरुची कर्मभूमी आमच्यासाठी कुठेही असणार नाही.
    सुचित दादा जेव्हा उपासना देतात तेव्हा आम्ही काय सांगतो ? नवरा किंवा मुले करणार नाहीत मग आम्ही केले तर चालेल का? मला सांगा नव~याऎवजी बायलो जेवली तर चालेल का ? नाही चालणार ..बरोबर
               दुसरे आपल्याला मदत करु शकतात पण ते कर्ज असते लक्षात ठेवा. ज्याची गोष्ट त्यानेच केली पाहीजे .
    गुरुचं कधी ऋण नसतं. मातृऋण पितृऋण असतं पण गुरुॠण कधीच नसतं. त्याचं कर्ज तो कोणावर ठेवत नाही. तो एकच असा आहे की जो कर्ज ठेवत नाही तर कर्ज देतो . कशासाठी तर तुमच्या कर्जाचा संचय कमी व्हावा म्हणुन , हे एकमेव सदगुरुच करु शकतो .
    हे काटे तो का टाकतो? तुम्हाला कर्ज फेडता यावं म्हणून. जागा का मागतो तुम्हाला भाडं देता याव म्हणून. तोच कर्ज देतो आणि तोच फेडून घेतो.
        गुरुचे चरण जिथे आहेत तेच गुरुक्षेत्रम्‌. मनाचा आम्ही दिलेला भाग म्हणजे गुरुक्षेत्रम्‌. मनाचा आम्ही जो भाग देतो तिथे आमचा सद्गुरु स्वत: उभा असतो .
     गुरुआज्ञा पालन ज्या प्रमाणात करतो त्याप्रमाणात नशिबाच्या दुप्पट जागा सद्‌गुरु देत जातो. साईनाथांनी काही वाचायला सांगितलं आहे तर ते वाचताना त्यावर स्वत: साईनाथ उभा असतो. तुमच्या चांगल्या प्रारब्धासाठी तुम्ही चांगल बनावं म्हणून ही जागा वाढवण्याचे काम हा सद्गुरुराया करत असतो.
    ही त्याची कर्मभूमी आहे, हा त्याचा धंदा आहे, हे त्याचे profession  आहे, त्याचा छंद आहे, ही त्याची  hobby  आहे .हा त्याचा स्व- भाव आहे . त्याशिवाय तो राहुच शकत नाही .
        क्षेत्र ह्याचा दुसरा अर्थ म्हणजे शेती. ह्यात ज्याचे शेत असते त्याचेच पीक असते जरी बीज इतर कुणीही पेरले असले तरी .
    ज्याचे शेत त्याचे पीक - हा क्षेत्रबीज न्याय आहे.
    पेराल तेच उगवेल अशी म्हण आहे. म्हणी अनुभवातून तयार होतात. सगळ्या भाषेत ही म्हण आहे. मनाची शेती तुम्ही करता तेव्हा गहू, तांदूळ कमी पेरता. द्राक्षे, धत्तुरा, नांरिंगी अशी नशिले विषारी पदार्थ जास्त पेरता. त्यांना उपटून टाकायची ताकद आमच्यात नसते .
     ह्यासाठी मग आपण contract / सुपारी सद्‌गुरुला द्यायची असते. बापरे! स्वत:ची सुपारी द्यायची? मग संपलेच सगळे. तर असे नाही . सुपारीचा आताच्या काळात अतिशय चुकीचा अर्थ लावला जातो .
    सुपारी देणे म्हणजे खर्‍या अर्थाने विडा उचलणे, मान्यता देणे.  त्याला आपल्या शेताची सुपारी देणे म्हणजे काय तर , त्याला सांगणे, " पाहीजे ते तू पेर व पाहीजे तसे तू वापर, तू हेच लाव असे मी सांगायला येणार नाही. तू ते पिक विकून मला पैसे दे असं मी  म्हणणार नाही. शेत तुझंच आहे. माझ्याकडून जे पेरलं गेलं आहे ते उपटून टाकायचं असेल तर टाक."
    हे शेत तुझं आहे, त्याचा मालक मी नाही. "
        आमच्या मनाचे शेत कुठले ? तर बुद्धी जो विचार करते त्या विचारानुसार मन जे वागत असते ते म्हणजेच आमच्या मनाचे कार्य जे बुद्धीच्या अनुभवाने चालते तो भाग म्हणजे शेती.
    बुद्धी जो विचार करते त्या विचारानुसार मन जसं वागतं त्याला मनाची शेती म्हणतात.
    आता मानव म्हणून जन्माला आल्यावर आपला अनुभव तो केव्हढा असतो ?  जिथे दोन तासा पूर्वीची, दोन दिवसांपूर्वीची आम्हांला नीट आठवण राहत नाही, तिथे आपल्या अनुभवाची शिदोरी ती  काय?  तुम्हांला जर आज सांगितलं तुम्ही दहावीत असताना तुमच्या वर्गात असणा~या मुलांची नावे लिहा तर तुम्हांला ती आठवणार आहेत का? परीक्षेसाठी सकाळी पाठ केलेली उत्तरे आपण संध्याकाळी परीक्षा झाल्यावर विसरतो !! आपली अक्कल ती किती असते ? 
    म्हणून आपल्या मनाची शेती आपल्याला त्याला देता आली पाहीजे. इथे , " राम दुवारे तुम रखवारे , होत न आग्या बिनु पयसा रे " हाच भाव आमचा असायला हवा. पण "तुला पाहीजे तशी ही शेती तू वापर" हे no objection certificate (NOC) गुरुला द्यायचे कसे ?
    तर अतिशय श्रद्धेने रोज गुरुमंत्र म्हणेन. म्हणजेच गुरुला NOC देणे. ह्या मंत्राच्या महात्म्यात आपण सर्वसमर्थं सर्वार्थ समर्थं कसे ते बघितले, गुरु क्षेत्र म्हणजे काय?  ते बघितले, गुरुक्षेत्रम्‌ मंत्राचा फायदा बघितला.
    ह्या संपूर्ण मंत्राची रचनाच विचित्र आहे . सर्व मानवांच्या पहिल्या जन्मापासुन (सत्ययुगा पासून) पुढे म्हणजे जगबुडी झाल्यानंतरच्या काळात सुद्धा NOC घेउन हा गुरुमंत्र तुमच्या जीवनात येईल .
    ज्याने ज्याने हा गुरुमंत्र श्रद्धेने म्हटला त्याच्यासाठी तुमची ईच्छा असो वा नसो हा मंत्र तुमच्या लिंगदेहात कायमचा कोरला जातो. ह्या मंत्राचे बीज तुमच्या लिंग देहात कायमचे सुप्तावस्थेत असते त्यामुळे जेव्हा आवश्यकता असणार तेव्हा ते आपोआप प्रगट होणारच आहे .
    एकदा का तुम्ही हा गुरुमंत्र मनापासुन स्वीकारला की ह्याचा  stamp  कायमचा तुमच्यावर बसला, तो कधीच पुसला जाणार नाही. अगदी कलीयुगाच्या अस्तानंतर सगळे नष्ट झाल्यानंतर पुन्हा नवीन युगाची सुरुवात होईल तेव्हाही हा मंत्र तुमच्या सोबत असणारच आहे .
    आज अशी एक बँक तुमच्या हातात आली आहे की जी कधीच रिकामी होणार नाही. आज गुरुमंत्र म्हणताना आपला उजवा हात छातीवर ह्रुदयाच्या जागी ठेवून त्यावर cross असा आपला डावा हात ठेवायचा व गुरुमंत्र म्हणायच. हे असे का ?? तर मी ( प.पू.बापू)  सांगितले म्हणून. त्याचा तुम्हांला कसा फायदा होणार हे सांगायला मी बांधील नाही .
    जेव्हा कधी मन विषिण्ण होते, अतिशय खेद वाटतो, nervous वाटते,  तेव्हा अश्या रितीने दोन हात ठेवुन गुरुमंत्र म्हणायचा. किती वेळा म्हणायचा? असे कुठलेही बंधन नाही . एकदा म्हणा, दोनदा म्हणा.
    भीती किंवा काळजी करण्याऎवजी अश्या रितीने गुरुमंत्र म्हणा, मनावरचे सर्व मळभ दूर होईल .


    ॥ हरी ॐ॥

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

    ॥ हरि ॐ ॥
    श्रीगुरुक्षेत्रम्‌ मन्त्र, अंकुर मन्त्र त्याच्यामधल्या अतिशय महत्त्वाच्या पदावर आपण आहोत. हे पद खूप दिवस चालू राहू शकत ह्यात आपल्याला खूप काही शिकायच आहे. पुढच्या आठवड्यापासून मला इथे एक बोर्ड पाहिजे म्हणजे आपली शाळा सुरू झाली. ‘वर’ शद्ब आपण पुराणात वाचतो, ह्याला अमुक वर मिळाला त्याला तमुक वर मिळाला. त्यानंतर पत्रिकेमध्ये ‘वर आणि वधू’ मध्ये वर हा शद्ब आपण पाहतो. वर ब्रह्मर्षी देतात ते जे बोलतात ते खरं होतं. वरदान म्हणजे आपण म्हणतो ‘ह्याच्याकडे जन्मजात संगीताचं वरदान आहे.’ जन्मजात आहे म्हणजेच फार मेहनत करावी लागली नाही. मनुष्याला स्वत:ला काही मेहनत करावी न लागता जे सुंदर भव्यदिव्य मिळत ते वरदान असत. ऋषी तपश्चर्या करतात मग त्यांना वर मिळतो. तर काही ठिकाणी साध्याशा गोष्टींनी देव प्रसन्न होतो आणि वर देऊन जातो, एकाला दहा वर्षे तर एकाला एक दिवस. देव त्याच्या मनाला येईल तसे वागत राहतो. हा देव मोठा लहरी आहे. माझ थोड उशीरा आणि कमी भलं करतो तर इतरांच लवकर आणि जास्त भल करतो, हा देव काही सरळमार्गी नाही. हा मनाला येईल तस वागतो. पण तस कधीच नव्हतं, नसेल, आणि नाहीए.
     
    ‘वर’ शद्बाचा मूळ अर्थ मनुष्याच्या मानवी जीवनातील मानवी प्रयासाच्या मर्यादा जिथे संपतात जर ती व्यक्ती श्रद्धावान असेल तर तिथे परमेश्वराच्या सामर्थ्याचं connection आपोआप जोडलं जात. जेव्हा मनुष्याच्या प्रयत्नांमध्ये गुणात्मक जास्त गुणात्मक फरक पडणार नाही असे दिसते, तेव्हा चण्डिकाकुल, परमेश्वर आपोआप connection जोडून त्याला extra ताकद, यश देतात. म्हणजे जर पूर्वी १०० ग्रॅम प्रयत्नांना १० ग्रॅम यश मिळत होत, तिथे १० ग्रॅम प्रयत्नांना १०० ग्रॅम यश मिळते. हे connection केव्हा जोडल जात जोपर्यंत तुम्ही मानवी प्रयास पूर्णपणे मनापासून करता तेव्हा तो भगवंत connection आपोआप जोडतो. प्रत्येकाच्या क्षमतेनुसार प्रत्येकाला वेगळे नियम लावतात. कर्माचा अटळ सिद्धान्त सर्वांना समान असला तरी चण्डिकाकुल व तिचा पुत्र परमात्मा प्रत्येकाला वेगळे नियम लावतात त्यामुळे अनेक problems सुटतात.
     
    नेहमी पहिल्या आलेल्या व्यक्तीला पुढे न्यायचे ठरवले तर काय होईल? बाकीचे कधीतरी पुढच्या वर्गात जातील का? उदाहरण म्हणून मीनावैनी, चौबळ आजोबा ह्यांना जेवढे marks मिळालेत त्यांच्या पटीत mark मिळाले तर तुम्ही वर याल अस असेल तर कोणी पास तरी होईल का? म्हणून प्रत्येकाला तो वेगळे नियम लावतो. प्रत्येक मनुष्यासाठी त्याच्या जीवनाच्या कालखंडानुसार वेगवेगळे नियम ती चण्डिका आणि तिचा पुत्र लावतात. फक्त दोनच गोष्टी fix असतात - १) कर्माचा अटळ सिद्धान्त आणि २) पावित्र्य हेच प्रमाण. ह्याला अनुसरुनच ते partiality करतात. ताकद असतानाचे नियम तुम्हाला ताकद नसताना लावले तर, लहानपणीचे नियम वयस्कर झाल्यावर लावले तर घोटाळे होतील. म्हणून स्वत:ची तुलना कधीही दुसर्‍याशी करू नका. परमेश्वराची कृपा दुसर्‍यावर किती झाली आणि माझ्यावर किती झाली ह्याची तुलना करण्याचा अधिकार तुम्हाला नाही. ज्याला हिरा खरा का खोटा माहित नाही तो हिर्‍याची तुलना कशी करणार. आम्ही परमेश्वराची कृपा बघितली नाही. परमेश्वर बघण लांब राहिल तो अनंत आहे त्याला समजून घेण शक्यच नाही. आम्ही लहान आहोत म्हणून परमेश्वराला आम्ही कसे जाणून घेणार. तर परमात्म्याची कृपा आमच्या आयुष्यात कुठे कुठे आली ह्या गोष्टी आठवल्या पाहिजेत. आपल्याला कळायला लागल्यापासून आमच्या जीवनात किती सुंदर गोष्टी घडल्या हे आठवलं की आपोआप आम्हांला परमेश्वराची कृपा नीट समजू शकते. ह्याला योगायोग मानू नका. ह्या जगात योगायोग नसतो. कुठलीच गोष्ट योगायोगाने घडत नसते. संकट येऊन गेल्यावर बापरे ! सुटलो - आठवा. परमात्म्याची कृपा कशी होते हे बघण्यासाठी दुसर्‍यांच जीवन बघण्याची, मूर्तीकडे बघण्याची, मोठमोठे धर्मग्रंथ वाचण्याची आवश्यकता नाही. माझ्या आयुष्यात किती चांगल्या गोष्टी घडल्या. माझ्या जीवनात मी चुकीचे वागत असताना पण परमेश्वराने किती मला भरभरून दिले हे आठवा.
     
    पण मनुष्याचा मोठा problem हा आहे की त्याच्या स्मृती केन्द्रात जे मिळालं नाही, दु:ख प्रसंगाची नोंद जोरदार असतात. परमात्म्याने स्मृती दोन्ही गोष्टींची समानच दिलेली आहे. सुख म्हणजे काय तर आम्हाला मिळालेल सुख भागिले आमची सुखाची अपेक्षा. आमची सुखाची अपेक्षा अनंत असते. दु:ख म्हणजे काय तर आम्हाला असलेलं दु:ख भागिले दु:खाची अपेक्षा म्हणून दु:ख increase होत राहतं. मिळालेल्या सुखाचा आनंद उपभोगता येत नाही. मिळालेल्या सुखाचा आनन्द आम्हाला परत-परत उपभोगता आला पाहिजे. मनुष्य नेहमी दु:ख परत परत जगत असतो.
     
    मृत व्यक्तीच्या आठवणी परत परत येतात. पण ssc पास झालो कि त्याचा आनंद परत साजरा करत नाही. Degree मिळाल्याचा आनंद नोकरी मिळविण्यात हरवून जातो. लग्नाचा प्रसंग आठवत नाही, पण नवर्‍याला बायको काय बोलली आणि बायकोला नवरा काय बोलला हे चांगल आठवतं. आईचे धपाटे आठवतात पण तिचं रात्रभर जागण आठवत नाही. जो पर्यंत ती गोष्ट असते तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही. आई असते तेव्हा तिची किंमत कळत नाही तिच्या स्पर्शाची ऊब जाणवत नाही. ह्या जगातील पहिली मूर्ती कशी घडली रेणूकामातेची घडली. आईवर निस्सिम प्रेम करणारा परशूराम पित्याच्या आणि मातेच्या देहाभोवती काष्ट रचलेली, अग्नी दिलाय ज्याक्षणी मातेचं मुख दिसल नाही तेव्हा त्याने दत्तात्रेयांकडे विनंती केली की एकदा मला माझ्या मातेला पाहायच आहे. आईला पाहून परमात्मा असणारा परशूराम धावत आईजवळ गेला. त्याने आईला स्पर्श करताच फक्त तिचं मुख राहिल त्यातूनच ही मूर्ती घडली. ह्या विश्वातील पहिली मूर्ती परमात्म्याच्या मातेच्या विरहामुळे घडली. आई-वडिल गेले की आम्ही रडतो.
     
    शाळेमध्ये कॉलेजमध्ये असताना मुलांना मारून मुकटून आपण पाठवतो. हल्ली मुलांचे बालपण निघून गेलयं. तारुण्यात तारुण्याची शक्ती नुसती उधळली जाते. शरीर थकलं की माझं तारुण्य फुकट घालवलं म्हणून दु:ख करतो. ह्या प्रवृत्तीमुळे माणसाच्या स्मरणशक्तीत वेदनेची तीव्रता जास्त असते. वेदना खोलवर जाते. जे दु:ख आहे ते आहे. पण ह्याची माझी अपेक्षा शून्य नाही झाली तरी माझा सद्‍गुरु माझ्या दु:खापेक्षा मोठा आहे. मिळालेलं सुख पुढच्या वटवृक्षा एवढ्या सुखाचे बीज आहे हे लक्षात ठेवा. आपल्या स्मरणशक्तीला आपल्याला training द्यावं लागत. दुसर्‍याने केलेला अपमान पटकन आठवतो पण मान आठवत नाही. इथे चण्डिकाकुलाकडून मिळणारा वर आवश्यक असतो.
     
    तिने रामाला वर दिला. तिच्यासाठी प्रत्येकाला नियम वेगळा आहे. ती रामाचे नियम तुम्हाला लावत नाही. चण्डिका आणि तिचे पुत्र माणसांशी युद्ध करत नाहीत त्यांच युद्ध असुरांशी असत. हेच आपल्याला मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषद्‌ शिकवत. हे चण्डिकाकुल असूरांशी परिक्षा घेत मनुष्यांची परिक्षा घेत नाही.
     
    एक विश्वास असावा पुरता कर्ता हर्ता गुरु ऐसा ।
     
    हा विश्वास मातृवात्सल्यविन्दानम्‌ आणि उपनिषदाने दिला आहे. मनुष्याच्या चुकांमुळे वृत्रासूर उत्पन्न होतो. जो मनुष्य वाईट वागतो तो वृत्रासुराच्या प्रभावाखाली गेलेला आहे.
     
    जो नियम ती रामाला लावते ती तो नियम आम्हाला लावणार नाही. त्यामुळे ओझं घेऊन फिरण्याची आवश्यकता नाही. आम्हाला ब्रह्मर्षी व्हायचं नाही. आम्हाला प्रपंच प्रेमाने करायचा आहे त्याबरोबर परमार्थातही प्रगती करायची आहे. माझ्या भावाचा, शत्रुचा नियम ती मला लावत नाही. म्हणून श्रद्धावानाच्या शत्रुचा पराजय होऊ शकतो. पण आमची अपेक्षा असते तिने जेव्हा आम्हाला पाहिजे तसे नियम तिने आम्हाला लावावेत. पण आम्हाला अक्कल किती? तिचे नियम कुठले ते माहित नाही. ती कृपा कशी करते? वातावरणात बदल कसे घडतात हे माहित नसतं. एखाद्या मोठ्या अपघातून मनुष्य वाचतो कसा? हे त्याचं काम आहे, हे तोच करू शकतो आणि त्यासाठी त्याठिकाणी धावत जायची गरज नाही हे आम्हाला समजलं पाहिजे. खेळ समजण्यासाठी खेळ बघावा लागतो, त्याचे नियम समजून घ्यावे लागतात. पण त्याचा खेळ बघणार कुठे कुठे? मग समजून कसा घेणार? डॉक्टर सांगतात ह्या मनुष्याच्या जीवनाचे दोन तास उरलेत तो मनुष्य दहा वर्ष संसार करतोय. ही परमात्म्याची लीला आहे. म्हणून शांतपणे एकच गोष्ट करायची, तिने सांगितलेलं वाक्य लक्षात ठेवायचं -
     
    "माझ्या बालका मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते."
     
    तुमच्यासाठी ती चण्डिका आणि तिचा पुत्र परमात्मा परशूराम पण हे वाक्य उच्चारतो. म्हणजे रामासाठी फक्त एक चण्डिका आईच हे वाक्य उच्चारते. श्रद्धावानासाठी ती चण्डिकाही हे वाक्य उच्चारते आणि परशूरामही सगळ्या श्रद्धावानांच्या कानात सांगतो. आम्ही अवतारांपेक्षा डबल भाग्यवान आहोत म्हणून लक्षात ठेवा सामान्य श्रद्धावान भक्ताकडे अवताराच्या दुप्पट ताकद असते. तुमच्यासाठी चण्डिका आई आणि परमात्मा दोघेही वचन देतात. त्याच्याजवळ एक वरदान आहे तुम्हाला दोन वरदान आहेत.
     
    तुम के प्रेमु राम के दुना
     
    जन्मत: चण्डिकाआईच एक वरदान आहे - "माझ्या बालका, मी तुझ्यावर निरंतर प्रेम करते"  ज्याक्षणी देवयान पंथावर प्रवास सुरु करतो तेव्हा परमात्मा आमच्यासाठी उच्चारतो. ही दोन वरदान तिनेच दिली आहेत. तिने कानात सांगितलीत, परशुराम आम्हाला ओरडून सांगतो. तुम्ही म्हणाल बापू आमच्यासाठी काय आकाशवाणी होणार का? आकाशावाणी कोणासाठी होते - कंसासाठी तुम्ही काय कंस आहात का? त्यापेक्षा प्रेमवाणीचा स्विकार करा. आम्ही हे वाक्य कोणाच्या तोंडून ऐकलय ते लक्षात ठेवा. आम्ही हे वाक्य ऐकलयं हेही आठवत नसेल तरी काही नाही. कारण वासरू रस्ता चुकलं तरी गाय चुकत नाही. शिष्याला एकदा आपल म्हटल त्याचा मार्ग नरकात जाणारा असेल तरी हा नरकात जायला तयार असतो. आम्हाला नरक नाही हे आम्हाला माहित पाहिजे. कारण -
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    आमचा रस्ता नरकाकडे जरी जात असला तरी तिथे साई येऊन उभा राहिल. आणि जिथे साई उभा आहे तिथे नरक असूच शकत नाही. आम्हाला जी प्रारब्धाच्या नियतीची भिती दासी आहे ती नियती चण्डिकेची यत्किंचित दासी आहे.
     
    जिस जिस पथ पर भक्त साई का । वहा खडा है साई ॥
     
    हे वाक्य कधीही विसरायचं नाही. आज तुम्हाला decleare करतो जे अग्रलेख नीट वाचतात त्यांना आठवते का ते बघा तो देवीसिंह पाठीवर स्कंदचिन्ह घेऊन फिरतो. तिथेच एक शद्ब येतो श्वास शद्ब होता. ‘श्रीश्वास’ हा शद्ब नीट लक्षात ठेवा. हा आम्हाला प्रत्येकाला मिळणार आहे सहजतेने, प्रेमाने आणि पूर्णपणे कसा? त्याच्याविषयी मला माहित नाही. जेव्हा मला माझी आई सांगेल की आता ‘श्रीश्वास’ सगळ्यांना द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला मी declare करेन, पण त्यासाठी तिने मान हलवली पाहिजे.
     
    ॥हरि ॐ॥

     

  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

    ॥ हरि ॐ॥
     
    आज हनुमन्त पौर्णिमा आहे त्याचबरोबर आदिमातेच्या उत्सवाचा दिवसही आहे. भारतात सगळीकडे आज महिषासुरमर्दिनीच्या देवळांमध्ये जत्रा असतात. असा हा आजचा पवित्र दिवस आहे आणि त्यात आज गुरुवार आहे.
     
    मनात अनेक विचार येत असतात. जो विचार नको असतो तो मनात येतो आणि हवा असणारा विचार येत नाही. ही परिस्थिती ह्या स्वस्तिक्षेम संवादामुळे नाहिशी होते. नको असलेला विचार येणे आणि पाहिजे तो विचार न येणे म्हणजे तुमचा फोकस नाही. तुमच्या बुद्धीचा मनावर control नसतो. आदिमातेची अठरा प्रभावकेंद्रे प्रत्येक मानवाशी जोडलेली असतात. प्रत्येक मनुष्य १४ वर्षानंतर व्यक्ती म्हणून स्वतंत्र होतो तेव्हा कोणतं connection तोडायचं आणि कोणतं जोडायचं ह्याचं स्वातंत्र्य त्याला असतं. ही १८ connections आम्हाला ह्या संवादातून जोडून मिळतात. weak connections नां जास्त power देण्याचं काम गुरुक्षेत्रम्‌ मध्ये होतं.
     
    आजचा दिवस अंजनामाता आणि आंजनेय हनुमन्त ह्या दोघांचाही दिवस आहे. आजचा दिवस असा आहे जो चण्डिकेचाही आणि तिच्या पुत्रांचाही आहे. म्हणूनच ह्या पवित्र दिवशी श्रीस्वस्तिक्षेम संवाद साधताना जीवनात आतापर्यंत जे काही चांगलं मिळालं आहे ते आठवायचं आणि शेवटी ‘मी अंबज्ञ आहे’ असं म्हणायचं.
    आज आपल्याला आद्यपिपादादांचे अभंग ऐकायचेत आहेत. पहिला अभंग अतिशय सुंदर आहे.
     
    ‘इंद्रधनुच्या नादात विसरतो आकाश । प्रतिमेच्या मागे सारे, आरशास पुसे कोण’
     
    आरशात प्रतिमा दिसते पण आरशाला कोणी विचारत नाही. इंद्रधनुष्याच्या नादात आकाशाला विसरतो. जे महत्त्वाचे आहे त्याच्याकडे आपलं लक्ष कमी वेधलं जातं. मूळ गोष्टीत मनुष्य जास्त interest घेत नाही. शेवटी ज्या मूळ गोष्टीमुळे इतर गोष्टी मिळतात तिला विसरलं तर इतर गोष्टी कशा मिळणार? 
    समजा एक स्त्री सुंदर स्वयंपाक बनवते नवर्‍याला सगळं काही त्याच्या आवडीचं जेवण बनवते त्याचबरोबर घरातील इतर कामेही व्यवस्थित करते. पत्नीपासून मिळणार्‍या लाभात तो नवरा interested आहे पण तिच्यावर पत्नी म्हणून प्रेम करण्यात तो interested नाही. मग ती काय तुमच्या घरची मोलकरीण आहे? पत्नीपासून मिळणारे लाभ तिच्या पत्नीत्वामुळे मिळतात.
     
    मूळ गोष्ट राखावी लागते, तर बाकीच्या गोष्टी मिळतात. आम्हाला एखादी वस्तू दिसते आहे. ती का दिसते? त्या वस्तूवर प्रकाश पडल्यामुळे दिसते आहे. पण नुसता प्रकाश असून चालेल का? जर तुमच्याकडे बघण्याची क्षमता नसती तर ती दिसली असती का? तर सगळ्या महत्त्वाची important  गोष्ट आहे बघण्याची शक्ती जी देवाने तुम्हाला दिली आहे.
     
    जीवनात जे दिसतं त्याच्या प्रतिमेत आम्ही अडकतो. आरसा स्वच्छ ठेवला नाही तर तो प्रतिमा दाखवेल का? स्वार्थ साधण्यासाठी तरी भगवंताला विसरलो नाही तरी भगवंताशी जोडून राहतो.
     
    हे अभंग हृदयाला स्पर्शून जाणारे आहेत. हे सगळ्यांच्या जीवनात जे काही घडलंय तेच सांगतात. साधी उदाहरणं दिली आहेत. जे साधं असतं तेच बेस्ट असतं. सगळ्यात बेस्ट गोष्टच सगळ्यात साधी असते हे मानवी मनाला पटत नाही आणि पटेपर्यंत जायची वेळ जवळ आलेली असते. साध्यासुध्या गोष्टी जीवनात अत्यंत आवश्यक आहेत आणि सगळ्यात बेस्ट आहेत.
     
    ॥ हरि ॐ ॥
     
  • परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

    ॥ हरि  ॐ॥
     
     
    साडेतीन मुहूर्तामधील एक पवित्र दिवस, सर्वात श्रेष्ठ दिवस ह्या दिवसातला क्षण न क्षण पवित्र, सुंदर, शांती समाधान देणारा मानला जातो. अतिशय सुंदरपणे पवित्र भावाने आज स्वस्तिक्षेम संवाद साधायचा आहे. जे तिच्याशी बोलायचं आहे ते तिला अतिशय सौम्यपणे सांगा. ह्या सुंदर दिवसाचं पावित्र्य जपत संवाद साधुया.
     
    आज आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या सुंदर पदाला - 
    ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:।’. 
    तशी सगळीच सुंदर आहेत आपण ह्या मोठ्या आईचं पद पाहायचं आहे. ॐ रामवरदायिनी श्रीमहिषासुरमर्दिन्यै नम:। ‘रामवरदायिनी’ ह्या एका शद्बामध्ये काय आहे हे लक्षात येतं. ह्याचा मूळ अर्थ रामाला वर देणारी हा आहे. ह्यात सात अक्षरे आहेत. हे नाव खूपच वेगळे आहे. कारण हा तिचा अवतार पण वेगळा आहे. हा सहावा अवतार आहे.
     
    तिचं मूळ नाव काय आहे - महिषासुरमर्दिनी. हे नाव कसं आहे जो महिषासुर आहे, त्याचा नाश करणारी म्हणजे तिचं मूळ नाव नाहीच. तिचं अस्तित्व म्हणजेच महिषासुराचं अनस्तित्व. अशीच ती रामासाठी युद्धभूमीवर प्रकटली कारण रावण मरत नव्हता म्हणून आणि काकासुर आलेला आहे. हा काकासुर कोण आहे, आपण मातृवात्सल्यविन्दानम्‌ मध्ये बघतो, हा शुंभाचा पुत्र आहे. प्रेमप्रवासमध्ये आपण पाहिलंय रावण म्हणजे काय? इथे लक्षात घ्यायचं आहे  हे असं स्वरूप आहे ज्या रूपात तिने एक मोठं समीकरण घातलेलं आहे आणि सोडवलेलंही आहे. राम वर आधी ‘रा’ आणि नंतर पुन्हा ‘र’ आणि मग ‘दायिनी’ ‘श्री’ बाजूला काढून आपण ‘रामवरदायिनी’ कसं फोड करून लिहिणार - र + आ + म + व + र + द + आ + य + इ + न + ई. ‘न’ चा ‘ण’ कसा होतो तर ‘र’ च्या सान्निध्यात ‘राम’ नाम तसंच आहे पण ‘रावण’ नावाचा तिने चोळागोळा केलाय, त्याला उलटंपालटं केलयं. म्हणजेच तिच्या ह्या नामात ज्याच्या हातून शत्रूचा नाश करायचा आहे आणि ज्याचा नाश करायचा आहे, ज्या शत्रूचा नाश करायचा त्यांची नाव आहेत. जो शत्रू आहे, त्याचं नावसुद्धा तुकडे तुकडे करून आपल्या गर्भात तिने ठेवलेलं आहे. ही रामवरदायिनी रामाला वर देणारी आहेच आणि ती प्रत्येक मनुष्यालासुद्धा बेसिक सांगते की ‘रामनाम’ हेच नाव रावणाचा नाश करण्याचं महत्वाचं शस्त्र आहे. सर्व श्रद्धावानांना दिलेला वर आहे. ह्या नामात रावणाला मारणारा ‘राम’ आहे, तुकडे तुकडे झालेला, खंडित झालेला ‘रावण’ पण आहे आणि ‘ईकार’ ही आहे ‘ईकार’ म्हणजे ‘शक्ती’. रामानामात तिची स्वशक्ती आहे, ती धारण करून तिने अवतार घेतलेला आहे आणि रामाकडून तिने रावणाला मारविले आहे. तुमच्या जीवनात रावण आला तर घाबरायचे कारण नाही.
     
    ही रामवरदायिनी ह्या मन्त्रामध्ये तिच्या नामासकट रावणाचा वध होऊन बसलेली आहे. म्हणून आरतीत काय आहे? आरतीत आपण काय म्हणतो - ‘षष्ठीते श्रीरामवरदायिनी । अशुभनाशिनी रक्ष चण्डिके ।’ सध्या शुभंकरा नवरात्र सुरू आहे. ह्या नवरात्रीला ‘शुभ’ का म्हणतात. रामाचा जन्म झाला त्यावेळी ही नवरात्र संपते म्हणून. अश्विन नवरात्रीला रावणाचा मृत्यू झाला म्हणून ती अशुभनाशिनी नवरात्र आहे. ही आदिमाता शुभंकरा असताना, अशुभनाशिनीही आहे. त्यासाठी तिने दोन टोकाची नामं धारण केली आहेत. तो जो कोणी शत्रू आहे, त्याचं नाव तिने मूळनाव म्हणून धारण केलं आहे. जो शत्रूचा नाश करणारा आहे त्याला वर देणारी आहे. तिने तिच्या मूळ धर्माला अनुसरून नाश केलेल्या शत्रूचं नाम धारण केलं आहे. हे नाव ह्या मन्त्रात आलं त्याचं हे background आहे. हेच इथे फिट आहे. ह्या मन्त्राचा (गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा) प्रत्येक शद्ब प्रचंड मोठी समीकरणं सोडवणार आहे तुमच्या नकळत.
     
    आपलं शरीर असंख्य अणूंनी बनलेलं आहे. आपल्या प्रत्येकाच्या शरीरात असंख्य पेशी आहेत, केमिकल्स आहेत, असंख्य अणू आहेत. अणू प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन च्या पुंजक्यांनी बनलेला असतो. म्हणजेच आपलं अख्ख शरीर प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्टट्रॉन ह्यांचे पुंजके आहेत. हे नातं महाप्राण maintain करतो, त्याला प्रेरणा अंजनामाता म्हणजे आदिमाता देत असते. प्रत्येक अणूला टिकवून हनुमन्त धरतो. त्याला चालना चण्डिका देते. एका अणूचं रूपांतर दुसर्‍या अणूत होतं ते ती करते. सगळी रचना तिचीच आहे. म्हणजे आम्ही पापं करतो ते आदिमाता करते का? वस्तूचे कण आहेत तसेच विचारांचे कणही आहेत. ह्या कणांना इच्छा शक्तीची मोकळीक तिने दिलेली असते, त्यात ती ढवळाढवळ करत नाही, आणि तिच्या मुलांनांही ती ढवळाढवळ करू देत नाही.  माझ्या इच्छा, विचार, निवड चुकली तरी त्या विचारकणांवर माझीच सत्ता चालत असली, त्यांना निर्माण करण्याचं स्वातंत्र्य तुमच्याकडे असलं तरी, त्याचात बदल करण्याचं सामर्थ्य तिच्यात आहे. चुका करण्याचं स्वातंत्र्य तुमच्यात आहे, आणि चुका दुरूस्त करण्याचं सामर्थ्य चण्डिकाकुलात आहे. तुमच्या चुका लक्षात आल्या तर जसे जमेल तसे नामस्मरण करायला सुरुवात करायची, चुका दुरुस्त करण्याच्या मागे लागायचं त्यांना आवरण्याची सत्ता तिला आहे.
     
    लहानपणी भोवरा फिरवलात त्याला नुसती दोरी बांधून चालेलं का? नाही. त्यासाठी skill यावं लागतं. सुरुवातीला ते येत नाही पण नंतर प्रॅक्टिसने ते येतं. मग तो भोवरा कसा फिरवायचा ते स्वातंत्र्य आहे. पण त्याच वजनाचा ठोकळा दिला तर तो फिरेल काय? नाही कारण तो भोवरा नाही. जेवढी तुमची इच्छाशक्ती, क्रियाशक्ती महत्त्वाची आहे, तेवढचं वस्तुमानही महत्त्वाचं आहे. आम्ही चुकत असू, भोवरा चुकीच्या ठिकाणी आपटत असू तरीही त्या आदिमातेने आमच्या हातात भोवरा तर दिला आहे. विचार करणार्‍या मेंदूच्या पेशी तिने दिलेल्या आहेत. त्यांना चालना देण्यासाठी ती अंजनामातारूपाने सुप्तावस्थेत असते, आणि तिचा पुत्र महाप्राण शरीरात असतो. देवीसिंह युद्ध कसं करतो हे आपल्याला माहीती आहे, माझ्या विचारांना तुझ्या चरणांवर सोपवलं आहे, हे त्या देवीसिंहाला सांगावं लागतं. ज्या क्षणाला तुम्ही त्याला हे सांगता, तेव्हा तो मेंदूतल्या योग्य पेशींना प्रेरित करतो. तुम्हाला आवडणारी गोष्ट आहे, पण तुमच्यासाठी ती उचित नसेल तर तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुमचे चुकीचे विचार लगेच थांबतात. तुमच्या रस्त्यात तो आडवा येतो, त्यामुळे तुम्हाला हवीशी वाटणारी गोष्ट तो प्रेमाने दूर करतो आणि तुम्ही म्हणता देव माझ्याशी किती कठोर वागतो.
     
    अनिरुद्धावरचा विश्वास, गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावरचा विश्वास, आणि त्याच्या आईवर तुमचं प्रेम असेल, तर आम्हाला घाबरायचं कारण नाही. ती स्वत: गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रात आमच्यासाठी एकाच वेळी शुभंकरा आणि अशुभनाशिनी बनून आलेली आहे, ती श्रद्धावानांसाठी आधी शुभंकरा नंतर अशुभनाशिनी किंवा आधी अशुभनाशिनी आणि नंतर शुभंकरा नसते. ती एकाच वेळी दोन्ही गोष्टी घडवून आणते.
     
    हा देवीसिंह जो आईच्या समोर तोंड करून उभा आहे तो कसा आहे? सगळीकडे देवाचं वाहन देवाकडे तोंड करून बघत असतं. पण हा एकच असा आहे जो त्या आदिमातेसमोर जो कोणी उभा आहे त्याच्याकडे तोंड करून नेहमी attenation position मध्ये तो असतो. हा तिच्याकडे जो कोणी बघताहेत त्यांच्याकडे बघतोय. तिच्यासमोर कोण येतो त्यांच्याकडे हा बघतो. महिषासुरासारखा आदिमातेचा शत्रू असेल त्याचा नाश करण्यासाठी हा झेप घ्यायला तयार आहे आणि प्रेमळ भक्त असेल तर त्यांच्यावरही हा झेप घ्यायला तयार आहे पण कशासाठी त्यांच्यामागून येणारा शत्रू, संकट ह्यांचा नाश करण्यासाठी. मनुष्य देवाकडे धावत केव्हा येतो, जेव्हा तो संकटात येतो. हे एकमेव दैवत असं आहे, श्रद्धावानांकडे तोंड करून attention मध्ये उभा आहे. ‘युगे अठ्ठावीस उभा’ कुठल्याही क्षणी झेप घेण्यासाठी तो तयार आहे. आदिमातेचा शत्रू असेल तर त्याचा नाश करण्यासाठी झेप घेतो, आणि श्रद्धावान भक्तावर त्याच्या शत्रूंचा नाश करण्यासाठी  झेप घेतो. उपनिषद्‍ मध्ये शेवटचा अध्याय परशुराम आणि त्रिविक्रमाचं  नातं सांगतो.
     
    ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्राचा प्रत्येक शद्ब फार वेगळी वेगळी समीकरणं सोडवत राहतो. ह्या पदातली सगळी प्रमुख समीकरणं मी तुम्हाला सांगणार आहे. ह्या मन्त्रातील सगळी समीकरणं तुमच्या जीवनातील सगळ्या problems ची समीकरणं सोडवतील. चुकीच्या गोष्टीचं निराकरण, पापाचा नाश, अयोग्य ते नाश करणं, कमी आहे ते भरून करण्याची ताकद तुमच्या जीवनासाठी प्रत्येक गोष्ट देणारा आहे. गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र समीकरण नाही तर तुमच्या जीवनात जे problem आहेत, समीकरणं आहेत त्याचं प्रत्येक  solution ह्या मन्त्रात आहेच.
     
    पुढच्या वेळेस आपण ह्या सात अक्षरांबद्दल शिकणार आहोत. आजच्या शुभंकरा नवरात्रीपासून आपण सुरुवात केली आहे. आपल्याला आनंद करायचाय, हया गंगेत डुबक्या मारायच्या आहेत. तुम्ही ह्यात बुडणार नाहीत हे लक्षात ठेवा. ह्या मन्त्राने अवगाहन करायचं आहे. आता आपल्याला हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा समीकरण सोडवत जातो ते पहायचं आहे. हे बरेच दिवस चालणार आहे. काळोखात चालत असताना माणसाचा हात धरलाय ज्याला पाऊल वाट माहितेय, तरी भीती वाटतेच की पायाखालून साप किंवा आणखी काय गेलं तर, पण जर प्रकाश असेल आणि bodygaurd पण बरोबर असेल तर भीती कसली? ह्या गुरुक्षेत्रम्‌ मन्त्रावर खूप प्रेम करा, प्रेमाने हा मन्त्र म्हणा. ह मंत्र तुमच्या जीवनात प्रकाश निर्माण करणार आहे. हा गुरुक्षेत्रम्‌ मन्त्र कसा निर्माण झाला व कोणी प्रथम म्हटला, हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे आणि ह्या आयुष्यात नाही तर, प्रत्येक आयुष्यात अनुभवायचं आहे.
     
    ॥ हरि ॐ ॥
 
 
  1     2     3     4     5  
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 6 Apr

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Anubhavs