|
सद्गुरु गुणसंकीर्तनाचा महिमा अपार आहे. सद्गुरु अनिरुध्दांवरील श्रध्दावानांच्या प्रेमातूनच अनेक भक्तिरचनांचा उदय झाला. ह्या भक्तिरचनांमधून श्रीअनिरुध्दांचे गुणसंकीर्तन केलेले आहे आणि ह्यातूनच जन्म झाला ऐलतीरी मी पैलतीरी तू, गाजतिया ढोल नि वाजतिया टाळ, पिपासा, वैनी म्हणे, पिपासा पसरली, तुम बिन कौन सहारा, अनिरुध्द दाय ग्रेस अशा अनेक सीडीज्चा!
परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुध्दांच्या दिव्यत्वाची ओळख आपल्याला ह्या भक्तिरचनांमधून होत असते. श्रवणभक्ति हीच प्रत्येक श्रध्दावान भक्ताला भक्तिमार्गावर स्थिर करत असते. अशा ह्या भक्तिरचनांमध्ये न्हाऊन निघण्याची सुवर्णसंधी ’न्हाऊ तुझिया प्रेमे’ ह्या सत्संगाव्दारे सर्व श्रध्दावानांसाठी खास उपलब्ध करण्यात आली आहे.
असा हा ’न भूतो न भविष्यति’ सत्संग सोहळा पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियम, नेरुळ, नवी मुंबई येथे रविवार दि. २६ मे २०१३ को सायंकाळी ४ वाजता परमपूज्य बापूंच्या आगमनाने सुरु होईल.
ह्या सत्संगाचे प्रवेशपत्र (एन्ट्री पास) गुढीपाडवा, गुरुवार दिनांक ११ एप्रिल २०१३ पासून श्रीअनिरुध्द गुरुक्षेत्रम् येथील संस्थेच्या कार्यालयात सकाळी ११ ते रात्रौ ८.३० वाजेपर्यंत व गुरुवार श्रीहरिगुरुग्राम येथे उपलब्ध करण्यात येईल.
ह्या भक्तिरसाच्या वर्षावात न्हाऊन निघताना परमपूज्य सद्गुरु श्रीअनिरुध्द बापू, परमपूज्य आई आणि परमपूज्य सुचितदादा हे स्वत: श्रध्दावानांसोबत असणार आहेत.
|