| Home / Narrations of Personal Experiences |


-
| |
काळ आला होता, पण वेळ येऊ दिली नाही
|
|
एकदा मी महाडवरून भिवंडीकडे गाडी घेऊन जात होतो. पावसाळ्याचे दिवस होते आणि १२.३० ते १ च्या दरम्यान पेणनजीक माझी गाडी आली असताना अचानक समोरून येणार्या गाडीने मला दाबले. गाडी सावरत असताना माझी गाडी रोडच्या बाजूला खोल खड्ड्यात पलटी झाली. संपूर्ण गाडीचे चारी टायर वरती झाले असतानाही माझ्या अंगाला लागले तर नाहीच परंतु साधे खरचटले सुद्धा नाही, हे बघून मला आश्चर्य वाटलं होतं. पण ही माझ्या सद्गुरुमाऊलीचीच कृपा आहे की जिवावरचं नुकसानीवर निभावलं.
- सतिश जाधव, सातारा
|
|
-
| |
|
|
|
‘मी तुला कधीच टाकणार नाही’ हे सद्गुरु बापूंनी भक्तांना दिलेलं वचन. श्रीवर्धमान व्रताधिराज वर्ष २००७. व्रताच्या उद्यापनाचा दिवस होता. मी, माझा मुलगा व मुलगी - आम्ही तिघेही तिसाव्या दिवशी नऊ निरांजनांनी ‘श्रीनव-अंकुर ऐश्वर्य कृपाशीष प्रार्थना’ म्हणावयास संध्याकाळी बसलो होतो. ही प्रार्थना संपताक्षणीच दारावर बेल वाजली. दार उघडलं तर माझे मिस्टर कामावरून आले होते. त्यांनी मला सुरळी केलेले दोन कागद दिले. उघडून बघितले तर काय, श्रीदत्तगुरुंचे दोन फोटो ! दोन कॅलेंडर्स. मग काय, आम्हां तिघांनाही इतका आनंद झाला की डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. माझे बापू माझ्या घरी आले.
- नीलम आफळे
|
|
-
| |
|
|
|
छोटेमोठे आजार असोत की कौटुंबिक अडचणी, साध्यासाध्या दैनंदिन आर्थिक विवंचना असोत की कर्जाचे डोंगर - कोणत्याही समस्येत आम्ही आमच्या देवाला - त्या बापुरायाला हाक मारली आणि तो धावत आला नाही असं ह्यापूर्वी कधी झालं नाही आणि पुढेही कधी होणार नाही. माझा काहीही संबंध नसतानाही माझ्यासमोर अचानक उभ्या राहिलेल्या कर्जफेडीच्या संकटात माझ्या सद्गुरुरायानेच मला कसं तारून नेलं, ते सांगणारा हा अनुभव.
- विलास खाडे, निपाणी
|
|
-
| |
ज्याने धरिले हे पाय आणि ठेविला विश्वास
|
|
खरं तर माझा भाऊ मिलिटरीत सर्विसला आहे व गेल्या आठ महिन्यांपासून त्याचं पोस्टिंग राजस्थानला आहे. त्याने तिथे जाण्यापूर्वी म्हणजे सुमारे आठ महिन्यांपूर्वी ह्या माणसाला माझा फोन नंबर दिला होता. मग ही व्यक्ती नेमकी आजच आपल्याकडे का आली ? आपण विचारलं नसतानाही बापूंचा महिमा आपल्याला का सांगितला ? हा कदाचित बापूंचाच ‘बुलावा’ तर नसेल ? असा विचार करतच आम्ही झोपी गेलो आणि दुसर्याच दिवशी त्या माणसाकडे जाऊन त्याच्याकडून बापुपरिवारात नित्य केले जाणारे पठण, जप, उपासना आदिंचे पुस्तक घेऊन आलो व हळूहळू बापूभक्तीत विलीन झालो. त्या वेळी मला कल्पनाही नव्हती की त्यानंतर एकाच महिन्यात माझ्या आयुष्यात अतिशय कठीण प्रसंग येणार होता आणि त्याचा मला सामना करता येण्याकरिता मला मनःसामर्थ्य आणि कवच देण्यासाठीच माझ्या सद्गुरुमाऊलीने ही सर्व योजना केली होती. तो अनुभव पुढीलप्रमाणे....
- अरुण पाटील, चिंचवड
|
|
-
| |
|
|
|
पावसाच्या व वार्याच्या जोरामुळे मी कुठेतरी फेकले जात आहे, असेच वाटत होते. माझ्या छत्रीच्या तारादेखील तुटल्या होत्या. मी ती उपयोग नसलेली छत्री बंदच केली. नाका-तोंडात पाणी जात होतं. रस्त्याच्या डाव्या बाजूला नाला होता आणि तो पाणी तुडुंब भरल्याने नदीप्रमाणे वाहत होता. मी वार्यामुळे त्याच दिशेने ढकलले जात होते. समोरचं काहीही दिसत नव्हते. मी नाल्यात पडणार, ह्याची जाणीव झाल्यावर मी जोरात ‘बाऽपू’ अशी हाक मारली. मला काहीच सुचत नव्हतं. पुढच्या क्षणी काय होईल, ह्याची जराही कल्पना मला नव्हती. माझ्या सद्गुरुंना हाका मारण्यापलीकडे मी काहीच करू शकत नव्हते.....आणि माझी हाक माझ्या सद्गुरुंपर्यंत पोहोचल्याची पावती लगेचच मिळाली.
- लीना बेटदूर
|
|
|
| |
|
| |
| |
| |
|
|