3        4     5    6        7    
  •  

    आधीव्याधी तू केलेस शांत

    प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले वाईट अनुभव हे येतच असतात. पण सद्गुरु बापूंच्या सानिध्यात आल्यानंतर श्रद्धावानांना चांगलेच अनुभव येतात; किंबहुना अनुभव कसाही असो, त्यातून पुढे चांगल्याच गोष्टी घडतात. असाच एक मला आलेल्या अनुभवाचे कथन मी बापूंच्याच चरणी अर्पण करणार आहे.

    - रतनबाई म्हात्रे
     

  •  

    विद्यार्थ्यासी विद्याबळ, ह्याचेनि प्राप्ते |

    पूर्वी दहावी आणि बारावीच्या परीक्षांआधी बापूंच्या दर्शनाची छान संधी मिळाली होती. या महत्त्वाच्या परीक्षेआधीही बापूंचे दर्शन घडावे, अशी खूप इच्छा होती. ती इच्छा सुद्धा माझ्या प्रेमळ बापूंनी पूर्ण केली होती. अचानकपणे आम्हाला नेमक्या परीक्षेआधीच्याच गुरुवारी पुष्पवृष्टीची संधी मिळाली होती. आरती झाल्यावर आम्ही रांगेतून दर्शनासाठी स्टेजजवळ गेलो. बापूंनी इतक्या गर्दीतही स्टेजवरून मला ‘ऑल द बेस्ट’ अशी खूण केली. माझा विश्‍वासच बसत नव्हता. बापू हसत होते. मनाला एक प्रकारचे बळ मिळाले. परीक्षेला जातानाही तो क्षण मी पुन्हा पुन्हा आठवत होते. अशा या मनःसामर्थ्य देणार्‍या बापूंना माझे शतश: प्रणाम !!!

    -    राधिका कुलकर्णी
     

  •  

    अशक्य ते शक्य करून दाखविले

    समस्या सर्वांनाच असतात. कोणाला छोट्या, कोणाला मोठ्या. परंतु माझ्या सद्गुरुंकडे लहान-मोठा असा भेदभावच नाही - भक्तांच्याही बाबतीत नाही आणि समस्यांच्याही बाबतीत नाही. त्या त्या परिस्थितीत असणार्‍या प्रत्येकाला स्वतःची समस्या मोठीच वाटत असते, हे बापू जाणतात आणि भक्तासाठी उचित तेच घडवून आणतात. तसे बापूंचे अनुभव आपल्याला प्रत्येकालाच जवळपास रोजच येत असतात. हे अनुभव आपल्याला सगळ्यांना ‘मॅग्नेट’सारखे (लोहचुंबकासारखे) त्यांच्या चरणांशी खेचून नेत असतात.


    - शोभा सोनवणे

  •  

    संकटात मिळे मनाधार....

    मानवी आईचे प्रयत्न थकले, तरी सर्व विश्‍वाची आई असणारी ती जगन्माऊली बापुमाय एखाद्या सतत तेवत्या दिव्याप्रमाणेच जागृतपणे त्या मुलीची पाठराखण करीत होती आणि त्या सद्गुरुतत्त्वाला अशक्य असं काय आहे ? अक्षरशः काहीच नाही. सावित्रीवीरांनी कळवळून ‘आता तूच माझा तारणहार’ अशा अनन्यभावनेने मारलेली हाक बापूंपर्यंत पोहोचलीच आणि ‘ही डिड द नीडफुल’!


    - सुमेधा कुमार

     

  •  

    प्रत्येक संकटाहून माझा बापू मोठा

    पतिच्या निधनानंतर मी खूप निराश व दुःखाने पीडित झाले होते. समोर सर्व अंधार पसरला होता. काय करावे, ते सुचत नव्हते. सर्व जग सुन्न, मन सुन्न होते. माझा भाऊ जयंत व त्याची पत्नी सौ. सुनिता हे दोघे चार वर्षांपासून बापूंची उपासना करतात. त्यामुळे मला दुःखातून बाहेर काढण्यासाठी माझी वहिनी मला बापूंच्या उपासनेला नेऊ लागली.खरं तर त्यावेळच्या निराश परिस्थितीमुळे उपासनेला वगैरे जाण्याचा मला अजिबात उत्साह नव्हता. तरी पण ते दोघेजण मला सतत उपासनेला नेत. बापूंबद्दल माहिती सांगत. असाच काही काळ गेला. मध्ये परमपूज्य बापूंचे अनेक अनुभवही आले व मी बापुभक्तीत दृढ होत गेले.


    - माधुरी पात्रे, औरंगाबाद

     


     

 
 
 
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 6 Apr

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Narrations of Personal Experiences