2        3     4    5        6    
  •  

    करी बाळांचे सरंक्षण, नजर कुणाची बाधेना

    तू आणि मी मिळून पाही |
    अशक्य असे काहीही नाही |
    देतो मुक्तकंठे ग्वाही |
    राजाधिराज अनिरुद्ध |


    सद्गुरु बापूंच्या चरणापाशी येऊन मला २-३ वर्षे झाली. माझी पत्नी मृण्मयी (पूर्वाश्रमीची रेश्मा कांदळकर) तिच्या माहेरी सर्वजण बापूमय झालेले. त्यामुळे लग्नानंतर त्यांच्याकडून बापूंविषयी इतके ऐकले की मन आपोआप बापूंकडे ओढ घेवू लागले आणि हळूहळू बापू आमच्या आयुष्याचा, सुख दुःखांचा हिस्सा बनले. आम्हीही बापूमय झालो. बापूंचे पावलोपावली आम्हाला अनुभव येऊ लागले. पण हा एक अनुभव असा आहे की बापूंचे आम्ही जन्मोजन्मींचे ऋणी झालो.

     

    -  अभिजित मयेकर, कांदिवली

     

  •  

    भीतिं क्लेशं त्व हराऽशु त्वदन्यम्

    तुम्ही धावा रे सत्वर | बापू उभाची तत्पर |

    या वचनाची  प्रचिती  येते  तेव्हा .........


    माझ्या आयुष्यातला हा अनुभव स्पष्टपणे दाखवून देतो की सद्गुरु माऊली बापू आपल्या प्रत्येक भक्ताच्या पाठीशी सदैव उभी असते व ह्या भवसागरातल्या संकटांतून तारुन नेते. मी ऑफिसच्या काही कामा निमित्त चायना, बिजिंगला गेलो होतो. ही माझी चायनाला पहिलीच भेट होती. ‘चायना मोबाईल’ या कंपनीने आयोजित केलेल्या परिषदेत वक्ता म्हणून माझी नेमणूक झाली होती. परिषदेच्या अंतिम दिवशी सांगता झाल्यावर जेवण संपवून टेबलावरुन उठता क्षणी माझ्या लक्षात आले की मी माझी जी बॅग बाजूच्या खूर्चीवर ठेवली होती तिची चोरी झाली आहे. आम्ही आठजण टेबलाभोवती बसलो होतो. तरीही ही गोष्ट कोणाच्याही लक्षात आली नाही याचे आश्चर्य वाटते.

    - आशिष देसाई, बिजिंग, चायना
     

  •  

    तुज वांचुनि आश्रय नाही (हरवलेली वस्तू सापडली)

    मी हतबल झालो होतो. पण त्याच क्षणी मला बापूंची आठवण झाली. काय करावे या विमनस्क मनःस्थितीत असतांना माझा देव माझ्यासाठी धावला. माझ्या बापूंची कृपा झाली नसती तर?

    -  श्री आशिश कात्रेकर, कॅलीफोर्निया

  •  

    भाव बळे होसि कृपाळू

    प.पू. बापूंच्या चरणी माझा निर्धार पक्का असेल तर कठीण परिस्थितीतही तो सेवा करुन घेतोच. जसा माझा भाव तसाच माझा अनुभव याची प्रचिती येते तेंव्हा ...

    - आशा नवले, जुईनगर

  •  

    परक्या देशातही आपल्या बाळांना फुलासारखा जपणारा, तो बापूच !

    माझी मुलगी प्रणाली शेखर देशपांडे ही फॅशन डिझाइनिंगच्या कोर्ससाठी लंडनला जायला निघाली होती. तो दिवस होता ९ सप्टेंबर २००९. रात्री २.२०ची तिची फ्लाइट होती. तिथे गेल्यावर मिस्टरांच्या ओळखीने त्यांच्या एका मित्राच्या घरी तिला राहायचे होते आणि मग तेथून तो मित्र तिला तिच्या युनिर्व्हसिटीच्या जवळच जागा बघून देईल असे ठरले होते. आता २.२०ची फ्लाइट म्हटल्यावर १०.३० पर्यंत घरून निघायला हवे होते. ‘लास्ट-मिनिट पॅकिंग’ चालू होते. घरी आलेल्या मित्रमैत्रिणींचा गोंधळ चालूच होता, त्याचबरोबर फोनही चालू होते.

    त्यातच अचानक लंडनहून फोन आला की तिथे गेल्यावर मिस्टरांच्या ज्या मित्राच्या घरी प्रणाली उतरणार होती, तो मित्र आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब काही कामानिमित्त बर्मिंगहॅमला निघून गेले. हे ऐकल्यावर माझ्या पायाखालची जमीन सरकली. 

    - नीता देशपांडे


     

 
 
 
 
 
Manasamarthyadata Latest News

Marathi

अनिरुद्ध साईंची खूण पटली

Hindi

ANUBHAV PUBLISHED IN HAMARA MAHANAGAR NEWSPAPER - 6 Apr

English

I will never abandon you!

Gujarati

ઉપાય પાસે હોય તો પછી શા માટે બહાર અટવાયા કરવું?

Kannada

ಅನಂತ ವ್ಯಾಪಕತ್ವ

Read All Experiences

Excerpts

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (०९.०५.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (२५.०४.२०१३)

परमपूज्य सद्‍गुरु श्री अनिरुद्ध बापूंचे प्रवचन (११.०४.२०१३)

Read Blog Rolls Submit Your Views Post Your Narrations of Personal Experiences