| Home / Narrations of Personal Experiences |


-
| |
|
|
|
१० जुलै, आषाढी एकादशीच्या दिवशी अतुलीत बलधामचे उद्घाटन होते. तो दिवस गुरुवार होता. मी उद्घाटनाच्या कार्यक्रमास जाण्यास उत्सुक होते. पण रविवारी ६ जुलै रोजी मी एका अडचणीत सापडले. मला माझ्या भावाचे ५००० रुपये देणे होते व हे पैसे देण्यासाठी मी ६ जुलै ही तारीख निश्चित केली होती.
- सौ. दिपाली पाटील, कोकणनगर
|
|
-
| |
आता नको नाती सारी, याच्या पायी माझी वारी
|
१९८० सालापासून मी हार्टपेशंट होतो. डॉक्टर वेंगसरकरांनी माझे व्हॉल वीक असल्याने मला लवकरच अटॅक येण्याची संभावना वर्तवली. पण मी नेहमीच जिवाला घाबरायचो म्हणून मी दुर्लक्ष केले व त्यामुळे ऑपरेशन करायचे नाही असे ठरवले होते. डॉक्टरांनी कल्पना दिल्याप्रमाणे मला २० डिसेंबर १९८३ ला पहिला हार्टअटॅक आला व १९८४ मध्ये दुसरा हार्टअटॅक आला. त्यावेळी मी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ३ महिने ऍडमिट होतो.
- दिनकर तुकाराम आंबेरकर, नानाचौक, मुंबई
|
|
-
| |
|
|
|
९ जानेवारी २००५ रोजी आमच्या अनिरुद्ध उपासना केंद्राचा वर्धापन दिन होता. माझे वरचेवर गावी जाणे असल्यामुळे वर्धापन दिनी मी सेवेसाठी नांव देऊ शकलो नाही. म्हणून केंद्रातील एका कार्यकर्त्याला विनंती केली की मला काही सेवा असल्यास द्यावी. त्यावर त्याने मला वर्धापनदिनी सकाळी सात वाजता या व काही सेवा असल्यास तुम्हाला देण्यात येईल असे सांगितले.
- श्री दिनकर तु. आंबेरकर, नानाचौक, मुंबई
|
|
-
| |
गुरुचि जेंव्हा धरती हातीं| तैंचि उद्धरती जडजीव
|
|
वाशीला १९८४ साली मी रहायला आलो. तेंव्हापासून डॉ.नर्सिकर आमचे फॅमिली डॉक्टर आहेत. नंतर ९७ साली आमच्या बेलापूर रिझर्व बँकेत डॉ. नर्सिकर मेडीकल ऑफिसर झाल्यामुळे आमचे घनिष्ट संबंध जुळले. एकदा डिसेंबर ९८ मध्ये त्यांनी सहज मला विचारले,‘‘जुईनगर येथे एक मंदिर बाधणं चालू आहे तर येता कां?’’
- श्री दिगंबर शेटे, वाशी, नवी मुंबई
|
|
-
| |
|
|
|
सप्टेंबरच्या १९ तारखेला सकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी माझा मुलगा कुमार ऑफिसमधून मोटार सायकलवरुन येत असतांना हायवेवर, बेस्ट बसचा धक्का त्याच्या डाव्या बाजूच्या हँडलला लागला. त्यामुळे तो १२ फूटावर उडून, डिव्हायडर ओलांडून विरुद्ध दिशेला बेशुद्धावस्थेत पडला. तिथून येणार्या जाणार्या लोकांपैकी त्याला कोणीच मदत केली नाही. इतक्यात....
- धनश्री प्रभु, बोरिवली
|
|
|
| |
|
| |
| |
| |
|
|