पूर्ण बंधू असे हा खरा
जैसी जयाची चित्तवृत्ती | तैसीचि अनुभूति रोकडी |
माझ्या बापुराया, तुझ्या लेकरांचे किती रे लाड पुरवतोस॥
माझ्या परमपुज्य लाडक्या बापूंना आपण ह्या रक्षाबंधनाला राखी बांधावी अशी खूप इच्छा होती. परंतु प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने वांद्रयाला रक्षाबंधनाच्या दिवशी जाणे राहून जायचे. मग आणलेली राखी मी बापूंच्या फोटोला सेलोटेपने चिकटवित असे. मनात म्हणे, बापू, तुम्हाला राखी बांधण्याचा योग कधी येईल?
- छाया गोरे, ठाणे
|