तूचि सांगाती सकळांचा
‘‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’’ ह्या वचनाची अनुभूती मला बापूंनी दिली. तो दिवस मी आयुष्यात कधीच विसरणार नाही आणि पुन्हा कधीही स्वतःला या उभ्या आयुष्यात एकटी मानणार नाही. तो भयानक दिवस म्हणजे दि.२६ जुलै २००५. सर्व मुंबईकरांच्या मनात तो खोलवर रुतून बसला आहे. दुपारी ३ च्या सुमारास काळोख पडला होता. जणू ती मुंबईकरांसाठी काळरात्रच होती. आभाळ कोसळेल का काय अशी भिती वाटत होती.
- अंजली जयवंत, मुंबई
|