संकटात मदत होई
जिथे सर्व काही संपते तिथे माझा बापू सहजलीला करतो. त्याचे अकारण कारुण्य कसे वर्णू?
वैटपौर्णिमा १९९८ पासून दर गुरुवारी माझे मम्मी पप्पा बापूंच्या प्रवचनाला जाऊ लागले. बापूंनी काय सांगितले, काय करायचे, काय नाही करायचे, हे सर्व काही ते आम्हांला आल्यानंतर अगदी रात्री २-३ वाजेपर्यंत सांगत असत. मी त्यावेळी लहान होतो, प्रवचनाला जात नसे. पण मम्मी पप्पांनी सांगितलेल्या गोष्टी खूप आनंदाने ऐकून त्या आचरणात आणण्याचा निश्चय करुन आम्ही झोपत असे.
- अभिषेक अशोक काटे, जोगेश्वरी
|