करी बाळांचे सरंक्षण, नजर कुणाची बाधेना
तू आणि मी मिळून पाही |
अशक्य असे काहीही नाही |
देतो मुक्तकंठे ग्वाही |
राजाधिराज अनिरुद्ध |
सद्गुरु बापूंच्या चरणापाशी येऊन मला २-३ वर्षे झाली. माझी पत्नी मृण्मयी (पूर्वाश्रमीची रेश्मा कांदळकर) तिच्या माहेरी सर्वजण बापूमय झालेले. त्यामुळे लग्नानंतर त्यांच्याकडून बापूंविषयी इतके ऐकले की मन आपोआप बापूंकडे ओढ घेवू लागले आणि हळूहळू बापू आमच्या आयुष्याचा, सुख दुःखांचा हिस्सा बनले. आम्हीही बापूमय झालो. बापूंचे पावलोपावली आम्हाला अनुभव येऊ लागले. पण हा एक अनुभव असा आहे की बापूंचे आम्ही जन्मोजन्मींचे ऋणी झालो.
- अभिजित मयेकर, कांदिवली
|